तुम्हाला सांगू इछितो, की सर्दी, वायरल ताप, इन्फेक्शन, आणि थंडी लागल्यामुळे नेहमी घशात कफ तयार होण्याच्या तक्रारी सुरू होतात, तसेच सतत नाक वाहाणे, छातीत आणि गळ्यात काहीतरी जमा झाल्याची भावना, श्वास घ्यायला त्रास होणे, गळ्यात खाज येणे, छाती जाम होणे, ही सगळी कफाची लक्षणे आहेत.
तर घशातील कफ दूर होण्यासाठी आणि त्यापासून होणार्या खोकल्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात, सिरप घेतात. परंतु, घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधोपचार ह्याने सहजपणे कफ बाहेर काढण्यासाठी घरगुती उपाय आपण करू शकतो. आज आपण जाणून घेऊया गळ्यात आणि छातीत जमा झालेला कफ कसा बाहेर काढता येईल.
तसे तर कफची समस्या जास्त गंभीर स्वरूपाची नसते, पण तो जर जास्त कालावधिपर्यंत राहिला तर श्वासाचे विकार होऊ शकतात. पण जर कफामध्ये रक्ताचे काही ठिपके सापडले तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटा आणि चाचणी करून घ्या, त्यामुळे कोणत्याही मोठ्या आणि गंभीर स्वरुपाच्या आजारापासून तुम्ही वाचू शकता. तर कफापासून वाचायचा एक चांगला उपाय आहे, तो म्हणजे त्याला शरीरातून बाहेर काढणे. कारण कफ गिळल्यामुळे तो परत शरीरात जातो आणि वाहणार्या नाकाची समस्या आणखी वाढते.
तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल.
आले- मध: आल्याच्या सेवनाने सर्दी-खोकला दोन्ही मध्ये फायदा होतो आणि श्वास घेण्याची प्रक्रिया सुरळीत होते. १०० ग्राम आले कुठून घ्या, २ ते ३ चमचे मध त्यात मिसळा. ही पेस्ट २-२ चमचे दिवसातून दोनदा घ्या. तुम्ही समस्या दूर होईल. गुळण्या करणे: एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घाला. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
काळी मिरी: काळी मिरी बारीक करा, त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण १० मिनिटे गरम करा. नंतर प्या. कांदा आणि लिंबू: कांद्याची साले काढा आणि तो वाटून घ्या. एका लिंबाचा रस काढून घ्या. हे दोन्ही एक कप पाण्यात घालून उकळा आणि एक चमचा मध मिसळून सेवन करा. लेमन टी: लिंबात असलेले साईट्रिक अॅसिड कफ कमी करण्यास मदत करते. ब्लॅक टी बनवा, लिंबू रस आणि मध मिसळून प्या.
हळद: कफासाठी हळद अत्यंत प्रभावी उपाय आहे. वाफ घेणे: गरम वाफ घेतल्याने श्वासाचा मार्ग मोकळा होतो. थाईम आणि लवंगेचा चहा: एका अध्यायनाने समोर आले आहे, की थाईम आणि लवंग यामध्ये अॅंटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. श्वसनमार्गाच्या संक्रमणात ते शरीरास लढण्यास मदत करतात.
आले: आल्यात सूज कमी करणे तसेच अॅंटी-ओक्सिडेंट गुणधर्म आहेत. आल्याचा चहा प्यायल्यामुळे घशाला आराम मिळतो. विटामीन सी: विटामीन सी च्या सेवनाने आपली प्रतिकारकशक्ति वाढवता येते. ज्यामुळे शरीर वायरस बरोबर लढायला सिद्ध होते. दिवसातून दोनदा तरी संत्र्याचा ज्यूस प्या. पण तो थंड घेऊ नका.
कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.