जे आपल्या पत्नीशी भांडतात ते कधीच आनंदी राहात नाहीत, त्यांची आर्थिक प्रगती थांबते!

एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या बरोबरच त्या व्यक्तीवर सर्व ग्रह नक्षत्रांचा प्रभाव होऊ लागतो. त्या व्यक्तीवर काही चांगले प्रभाव आणि काही वाईट प्रभाव पडतात. कोणत्याही मुलाच्या जन्माच्या वेळीच त्याची जन्मकुंडली तयार केली जाते, जेणेकरुन त्याच्यावर पडणार्‍या ग्रह आणि नक्षत्रांच्याबद्दल माहिती मिळू शकते. परंतु ग्रह नक्षत्रांच्या प्रभावापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या कर्माचा प्रभाव त्याच्या जीवनावर जास्त असतो. जर व्यक्तीची कृती/ त्याने केलेले कार्य चांगले असेल तर ग्रहांचा शुभ आणि अशुभ प्रभाव देखील बदलू शकतो.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या सवयी असतात आणि काही वाईट सवयी असतात. त्याच्या काही सवयी तर अशा असतात, ज्या आयुष्यभर त्याच्याबरोबर राहातात. काही लोक काळानुसार त्यांच्या वाईट सवयी बदलतात, परंतु काही लोक मनात असूनही त्या बदलू शकत नाहीत. आपण बर्‍याचदा कितीतरी लोकांना आपल्या बायकोशी भांडताना पाहिले असेल. असे लोक आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाहीत.

महिला असतात घराची लक्ष्मी: जर तुमच्यातही अशा काही सवयी असतील तर तुम्ही वेळेत त्यात बदल करा नाहीतर आयुष्यात श्रीमंत होण्याची तुमची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. भारतात महिलांना लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. एक स्त्री घराला स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवू शकते. असे म्हटले जाते की ज्या घरात स्त्रियांचा आदर केला जात नाही, अशा घरात दारिद्र्य कायम नांदते. याउलट, ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो, त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

जिथे आनंद आणि शांतता असते, तेथे पैशाची कमतरता नसते: एका कुटुंबाची खुशी ही पती आणि पत्नी या दोघांवर अवलंबून असते. जर पती-पत्नी दोघांनी एकत्र प्रयत्न केले, तर कधीही जीवनात निराशा येत नाही. सत्य हेच आहे, की जेथे आनंद आणि शांतता निवास करते, तेथे पैशाची कमतरता येताच नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, स्त्रियांच्या कुंडलीत असलेला गुरु आणि पुरुषांच्या कुंडलीतील शुक्र अशी जोडी हे सुखी जोडपे असल्याचे प्रतीक आहे.

शुक्र हा प्रणयरम्य आणि संमोहनाचे प्रतीक आहे. यामुळे शारीरिक सौंदर्य, विवाह, वंशवाढ आणि प्रेम वाढते. जर एखाद्या पुरुषाच्या कुंडलीत शुक्र अशुभ असेल तर त्याला धन आणि आरोग्याशी संबंधित अशा दोन्ही समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या जन्मकुंडलीतील शुक्र अचूक करण्याचे काही मार्गः

आपल्या जोडीदाराचा नेहमीच आदर करावा. दररोज आपले गुप्तांग हे दहयाने धुवावे. कांस्य पात्रात सात धान्ये भरुन एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन दान करावी. चुकूनही सूर्याच्या उपस्थितीत म्हणजेच दिवसा शारीरिक संबंध करू नयेत. शरीरावर जिथे नको त्या ठिकाणी केस आहेत, तेथे ते स्वच्छ केले पाहिजेत. अशा ठिकाणी केस तसेच ठेवणे अशुभ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.