अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही आणि ह्याचे कारण आहे आपली झोपण्याची पद्धत. आपल्या तब्येतीवर आपल्या झोपण्याची पद्धत खूप परिणाम करते. तुम्ही किती निरोगी आहात, हे तुमच्या झोपण्याची पद्धत कशी आहे या गोष्टीवर अवलंबून असते.
या अवस्थेत झोपणे योग्य: स्टारफिश अवस्था: ह्या पद्धतीने झोपणे तुमच्यासाठी उत्तम आहे, कारण त्यामुळे तुमच्या चेहर्याचा तजेलदारपणा टिकून राहातो आणि कितीतरी आजार तुमच्यापासून दूर राहातात. या पद्धतीत झोपणे म्हणजे, पाठीवर जोर देऊन झोपणे, नंतर दोन्ही पाय अशा रीतीने पसरावेत की पायातील अंतर कमी होईल आणि हात वर उचलून डोक्याजवळ ठेवावेत. ही एक एकदम आरामदायि पद्धत आहे. यामुळे तुम्हाला उत्तम झोप लागू शकते.
उजव्या कुशीवर: सर्वसामान्य माणसासाठी उजव्या कुशीवर झोपणे खूपच फायदेशीर आहे. उजव्या कुशीवर झोपल्यामुळे जेवण चांगल्या पद्धतीने पचते आणि पाचनक्रिया उत्तम रीतीने काम करते. गर्भवती महिलांसाठी ही पद्धत खूपच योग्य आहे. या अवस्थेत ज्या व्यक्ति झोपतात, त्यांच्या शरीराला खूपच आराम मिळतो. उजव्या कुशीवर झोपल्यामुळे घोरण्याचा त्रास नाहीसा होतो.
पाठीवर भार देऊन झोपणे: जास्तीत जास्त लोक या पद्धतीने झोपणे पसंत करतात, ही झोपायची एक अतिशय सामान्य पद्धत आहे. पाठीवर भार देऊन झोपणे सगळ्यात उत्तम आहे, त्यामुळे आजार आणि वेदना दूर होतात.
लहान मुलासारखे झोपणे: झोपण्याच्या पद्धतीत भ्रूण (लहान मूल) पद्धत ही पण उत्तम मानली जाते. या पद्धतीत गुढगा थोडासा दुमडून हृदयाच्या दिशेने घेणे. या पद्धतीत झोपणे हे खूप सोपे असते, कारण यामुळे आपण आरामात कुशीवर वळू शकतो आणि हाडांवर ताण पडत नाही. लहान मुले अशीच झोपतात.
ही आहे चुकीची झोपण्याची पद्धत: डाव्या कुशीवर झोपण्याची पद्धत : डाव्या कुशीवर झोपल्यामुळे हृदयावर भार (दाब) पडतो आणि रक्ताभिसरण योग्य होत नाही. खांदा आणि हात सुन्न होतात व आपल्याला निद्रानाश होऊ शकतो.
पोटावर झोपणे: पोटावर झोपल्यामुळे शरीरात वेदना होतात आणि हाडे कमकुवत होतात. पाय दुमडून झोपणे: पाय दुमडून झोपल्यामुळे मानेवर ताण येतो आणि महिलांच्या छातीवर ताण पडतो. नेहमी आपल्या झोपण्याची पद्धत वरती सांगितलेल्या पद्धतीने ठेवा.