अनेक वर्षानंतर नीना गुप्तांचे दुःख आले बाहेर, म्हणाल्या – विवाहित पुरुषांशी कधीच करू नका प्रेम नाहीतर…

बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर अनेक वर्षानंतर नीना गुप्ताने आपल्या मनाची गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे. नीना गुप्ता ऐंशीच्या दशकामध्ये या इंडस्ट्रीमध्ये जोडली गेली आणि त्यांनी एका पेक्षा एक भूमिकाद्वारे चित्रपटामध्ये चांगला अभिनय सुद्धा केला. नुकताच त्यांनी चित्रपट बधाई हो मध्ये काम केले होते, जो चित्रपट सुपर हिट ठरला. यामध्ये भलेही ते अभिनेत्याची आईचे काम करत होते परंतु या चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्रीची भूमिका नव्हती. नीना गुप्ता ने माध्यम सोबत बातचीत करताना आपल्या मनाची गोष्ट शेअर केली आणि माध्यमांसमोर त्यांचे दुःख बाहेर आले.

नीना गुप्ता ने सांगितली आपल्या दुःखाची कहाणी… वयाच्या साठाव्या वर्षी नीना गुप्ता चित्रपटांमध्ये सक्रिय आहेच आणि आपल्या अदाकारीने लोकांचे हृदय जिंकत आहे. नुकताच त्यांनी चित्रपट शुभमंगल सावधान मध्ये काम केले होते आणि पुन्हा एकदा उत्तम अभिनय केला, जो लोकांना आवडू लागला होता. या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांच्या पतीची भूमिका अभिनेता गजराज राव यांनी साकारली होती. याआधीही जोडी आपल्याला बधाई हो या चित्रपटांमध्ये दिसली होती . नीना चित्रपटा शिवाय आपल्या व्यक्तिगत जीवनामध्येसुद्धा चर्चित राहते . आपल्या बोल्ड फोटोद्वारे सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित करत असते.

नीना यांनी माध्यमांशी बातचीत करताना आपले काही दुःख सांगितले .खरेतर सध्याच्या काळामध्ये नीना उत्तराखंडमध्ये सुट्टी साजरी करत आहे . नीनाने तेथूनच सोशल मीडियावर एक म्हणणे मांडले आहे आणि आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहे. नीनाने मुलींना आणि महिलांना एक सल्ला दिला आहे की, ते कधीच लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नये. व्हिडिओमध्ये नीनाने आपले व्यक्तिगत अनुभव शेअर करत आहे.

नीनाने सांगितलं की विवाहित पुरुषासोबत की अफेअर केल्यानंतर अनेक अशा परिस्थिती निर्माण होतात, त्या परिस्थितीला सामोरे जाणे खूपच कठीण असते. व्हिडीओ मध्ये सांगितले आहे की ,आहे तुम्हाला त्याच्यासोबत वेळ घालवायचा असतो मग तुम्ही त्यांना लग्न करायला सुद्धा सांगतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर दबाव निर्माण करतात ,घटस्फोट घ्या आणि लग्न करा नंतर तुम्हाला राग सुद्धा येऊ लागतो.

कधी कधी तुमचे मन करते कि तुमचे मन करते कि सगळे त्याच्या बायकोला फोन करून सांगून द्यावे नंतर वाटते की सोडून दे यार त्या गुंतागुंतीच्या समस्यामध्ये कुठे पडायचं.. खरं सांगू तर कधीच विवाहित पुरुषाच्या प्रेमात कधीच पडू नका .मी असे केले आहे. या दरम्यान मला खूप सारे झेलावे लागले. म्हणूनच मी तुम्हाला असा सल्ला देत आहे की ,तुम्ही असे काहीच करू नका!!…

आपणास सांगू इच्छितो की ,नीनाने आपल्या करिअरची सुरुवात मध्येच वेस्टइंडिझ क्रिकेटर विविअन रीचर्डस सोबत प्रेम केले होते आणि दोघांचेही नातेसंबंध खूप दीर्घकाळ चालले होते. लग्नाच्या आधी नीना प्रेग्नेंट झाली होती .यानंतर त्यांचे नाते संपले होते .नीनाला एक मुलगी सुद्धा आहे तिचे नाव मासाबा गुप्ता आहे .नीना सिंगल मदर बनून आपल्या मुलीचे पालन पोषण संगोपन करत आहे.

नीना गुप्ताने शुभमंगल जादा सावधान आणि बधाई हो याशिवाय पंगा द लास्ट, कलर, त्रिकाल, जाने भी दो यारो,
वो चोकरी, खलनायक, उत्सव, बलवान, अंत, वीरता, स्वर्ग, गांधी, वीरे दी वेडिंग या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. नीना गुप्ता चा आगामी चित्रपट सूर्यवंशी जो २४ मार्च ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टी द्वारा दिग्दर्शित केलेला आहे आणि करण जोहर द्वारा निर्मित आहे यामध्ये अक्षय कुमार आणि कटरीना कैफ प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. याशिवाय रणवीर सिंह आणि अजय देवगन या चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *