नमस्कार मित्रांनो,तुमच्या घरात कोणतेही धान्य असेल म्हणजे गहू, तांदुळ, तूर, मूग मटकी, या मध्ये किडे आणि जाळ्या होणे नित्याची समस्या आहे. धान्य काही महिने पुरेल म्हणून आपण भरून ठेवत असतो, आपल्या घरामध्ये आणून ठेवत असतो. त्यामध्ये डाळी असतील तांदुळ असतील गहू असेल परंतु या धान्याला किडे फार पोखरून टाकतात.
सोंड कीडा (टोका किडा) होणे, जाळ्या होणे या नित्याच्या समस्या असतात. आणि हे धान्य घराब झालं की आपल्याला वापरता येत नाही. विशेषता कडधान्य मूग, मटकी हे जर खराब झालं की ते आपल्याला परत वापरता येत नाही. त्यामध्ये आता मध्ये जाऊन हे किडे बसतात. काही केल्या बाहेर निघत नाहीत. किडे होऊ नयेत म्हणून विविध प्रकारचे केमिकल औषधे आपण वापरत असतो, गोळ्या वापरात असतो,
इंजेक्शन वापरत असतो परंतु या मुळे धान्याला वास लागतो. ते धान्य खावंसं वाटत नाही. शिवाय त्या केमिकल चा आपल्या शरीरावर परिणाम सुद्धा होऊ शकतो. म्हणून आम्ही आज तुम्हाला अत्यंत साधा व घरगुती उपाय सांगणार आहे जा मुळे तुमच्या धान्यामध्ये किडे अजिबात होणार नाहीत. आणि जरी हे किडे तुमच्या धान्यामध्ये झाले असतील आधी, तरी तुम्ही हा उपाय केल्यानंतर सर्व किडे निघून जातील. बाहेर पडून जातील. चला तर मग पाहुयात उपाय काय आहे.
तुमच्या घरामध्ये धान्य कोणतेही असेल तर हे धान्य ज्यास्त दिवस टिकाव, त्याच्या मध्ये कीड होऊ नये म्हणून, जरी कीड झाली असेल तरी हा साधा उपाय करायचा आहे. सर्वांच्या घरामध्ये पेपर असतो तर कोणताही धान्य भरत असताना त्या मध्ये न्युज पेपर चे लहान लहान तुकडे करून टाकायचे. या पेपर च्या वासामुळे त्या मध्ये कोणताही किडा, जाळी होत नाही.
तुम्ही करून पहा. त्याचबरोबर याचा आणखी एक फायदा असा आहे की ज्या वेळी आपल्याला धान्य लागेल त्या वेळी हे पेपर आपल्याला सहज बाजूला करता येऊ शकतात.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. अत्यंत साधा उपाय आहे.
जर तुमच्या घरामध्ये आधीच धान्यामध्ये किडे झाले असतील तरी सुद्धा तुम्ही हाच उपाय करायचा आहे. या साठी तुम्हाला न्युज पेपरच वापरायचा आहे दुसरा कोणता पेपर वापरायचा नाही. न्युज पेपर ची जी शाई असते त्या शाई मुळे हे जे किडे आहेत त्या निघून जातात. आहे की नाही सोपा उपाय..तुमचं धान्य अजीबात खराब होणार नाही. आरोग्य दायी धान्य तुम्हाला खायला मिळेल.
नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!