दांत दुखणे मिनिटात बंद करून दातांतील कीड घालवणारा घरगुती रामबाण उपाय….

व्यक्तीच्या चांगल्या हसण्याच्या मागे त्याच्या स्वस्थ दातांचा मोठा वाटा असतो म्हणून आपल्याला आपल्या दातांची साफसफाई आणि देखभाल करणं खूपच आवश्यक आहे. एक चांगले हास्य तुमच्या सुंदरतेला चार चाँद लावत असते म्हणूनच दातांचे स्वास्थ आणि आरोग्य मजबूत असणे गरजेचे आहे परंतु चुकीचे खानपान शैली आणि अनियमितपणा या साऱ्या गोष्टींमुळे आपण आपल्या दातांवर अजिबात लक्ष देत नाही, त्यामुळे आपले दात किडू लागतात.

पुढे चालून आपल्या दातांमध्ये दुखणे निर्माण होतात व दातांमधून रक्त येण्याची समस्या निर्माण होते. या सोबतच दातामध्ये कीड येऊ लागते ,ज्यामुळे तुमचे दात कमजोर होतात. जर तुम्ही सुद्धा या समस्येपासून त्रस्त असाल तर चिंता करणे सोडून द्या. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगणार आहोत, त्यामुळे तुम्हाला भविष्यात नक्कीच मदत होईल.

दाताला कीड लागण्याची कारणे : सध्याच्या काळामध्ये लोकांचे जीवन खूप व्यस्त झालेले आहे ,ज्यामुळे सकाळच्या वेळी घाई मध्ये लोक आपल्या दातांची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि त्यात सुद्धा योग्यरीत्या स्वच्छ करत नाही म्हणूनच दातांची स्वच्छता नीट न झाल्यामुळे हळूहळू दातांना कीड लागू लागते. याशिवाय तुमचा मुलगा जर अधिक गोड पदार्थ खात असेल तर यामुळेसुद्धा दातांमध्ये कॅव्हिटी सुरू होते ज्यामुळे असहनीय दुखणे सहन करावे लागते.

दाताच्या किड्यापासून मुक्तता मिळविण्याचे उपाय : प्रत्येक घरामध्ये लवंगचा आवश्य उपयोग केला जातो. लवंगमध्ये उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि उपलब्ध असणारे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या समस्यावर खूपच लाभदायक ठरतात. तज्ञ मंडळीची अशी मान्यता आहे की ,जर कुणा व्यक्तीच्या दातांवर कीड लागली असेल तर दररोज २३ लवंगचे तेलांचे थेंब टाकल्याने या समस्येपासून मुक्तता मिळते. जर कीड लागलेल्या दातांवर लवंग तेलामध्ये भिजवलेला कापूस ठेवल्यास दात दुखी पासून सुटका मिळते .

तुम्ही लसुनचा वापर करून आपल्या दातांच्या समस्या पासून मुक्तता मिळू शकता. लसून मध्ये अनेक असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत जे आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यास मदत करत असतात. तुम्हाला दात दुखी पासून मुक्तता मिळवायचे असल्यास एक ते दोन लसूण पाकळ्या बारीक वाटून कीड असणाऱ्या जागेवर लावा किंवा कीड असलेल्या दाताने लसणाच्या पाकळ्या तोंडामध्ये धरून चावा . जर तुम्ही नियमितपणे असे करत केल्यास तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

तुम्ही हिंगच्या साहाय्याने सुद्धा आपल्या दातांना खराब होण्यापासून वाचवू शकता. तुम्ही हिंग मध्ये थोडेसे लिंबूचे रस मिसळून याचे मिश्रण तयार करून घ्या आणि दररोज कीड लागलेल्या दातावर लावा .यामुळे दातांमधील किडा बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला दात दुखी पासून मुक्तता मिळेल.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.