पोट साफ होत नाही यामुळे जर तुम्ही हैराण असाल, तर या ५ वस्तु वापरा, तुम्हाला त्वरित आराम पडेल…

पोट साफ न झाल्यामुळे या समस्या उद्भवतात: आजच्या जीवनातील आपले खाणेपिणे हे आपल्या पोटाची पचनशक्ती बिघडवायला कारणीभूत ठरते. आजकाल खूप लोकांना पोट साफ न होणे या समस्येने ग्रासले आहे. ज्यामुळे ते पूर्ण दिवस, थकावट, डोकेदुखी, चिडचिड, अपचन, बद्धकोष्टता, पोटदुखी आणि अशा कितीतरी आजारांनी त्रस्त असतात.

जर पूर्णत: पोटातील मळ साफ झाला नाही, तर बद्धकोष्टतेबरोबरच, मूळव्याध सारख्या तक्रारी थोड्याच दिवसात सुरू होतात. गॅस आणि बद्धकोष्टता यामुळे चेहेर्‍यावर मुरूमे आणि फोड येऊ लागतात. त्यामुळे चेहर्‍याची सुंदरता आणि तजेलदारपणा नाहीसा व्हायला लागतो.

सगळ्यांनाच माहिती आहे, की आपल्याला होणारे जास्त आजार हे पोटातूनच होतात. त्यासाठी आपण कितीतरी प्रकारची औषधे घेतो. परंतु, त्याचा चांगला परिणाम लवकर दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला असे ५ आयुर्वेदीक उपचार सांगणार आहोत, जो तुमचे पोट साफ ठेवेलच, पण त्यापासून होणार्‍या आजारांपासून तुमचे संरक्षण करेल.

पाणी: सकाळी उठल्यावर आपण नेहमी योग्य प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. कमीत कमी २ ग्लास कोमट पाणी पिऊन मगच सौचाला जावे. त्यामुळे तुमचे पोट साफ होऊ लागेल. ज्यामुळे कितीतरी आजार बरे होतील, जसे की शरीरास दुर्गंधी येणे इत्यादि. मथी: रोज झोपायच्या आधी मेथीचे चूर्ण १ चमचा कोमट पाण्याबरोबर घ्या. सकाळी एकदम सहजतेने तुमचे पोट साफ होईल.

लसूण: लसणीचे सेवन आपण जेवणात जरूर केले पाहिजे. कारण लसणीमध्ये मळाला मऊ बनवून तुमच्या आतड्यांमधून त्याला बाहेर काढण्याची क्षमता असते. यामध्ये अॅंटी इन्फलामेटरी गुणधर्म असतात, जे पोटाची सूज कमी करण्याचे काम करतात. तुम्ही रोज लसणाच्या १-२ पाकळ्या खाऊ शकता, त्यामुळे तुमची आतडी मजबूत व स्वस्थ राहातील.

दही: पोट साफ ठेवण्यासाठी दहयाचे सेवन करणे खूपच गुणकारी असते. कारण दहयामध्ये फायदेशीर असे बॅक्टीरिया असतात. जे तुमच्या शरीरात चांगले बॅक्टीरिया वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे, तुमचे पोट सहजपणे साफ होऊ शकते. दही खायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की दही थंड असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी त्याचे सेवन करू नये. असा प्रयत्न करा, की दही हे तुम्ही दुपारच्या जेवणात सेवन कराल. ज्यामुळे, तुमचे पोट दिवसभर शांत राहील, आणि गॅस, अपचन यासारख्या तक्रारींपासून तुम्हाला आराम मिळेल.

लिंबू आणि मध: जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर रिकाम्या पोटी, लिंबू आणि मध एक ग्लास पाण्यात एकत्र करून प्या. त्यानंतरच, शौचास जा. त्यामुळे, तुमचे पोट एकदाच साफ होईल, तुम्हाला वारंवार शौचास जावे लागणार नाही.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.