तुम्ही विचारही केला नसेल असे अंजीर खाण्याचे आहेत ७ चमत्कारिक फायदे…

अंजीर हा सुकामेव्याचा एक प्रकार आहे. हे एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. हे फळ रसाळ आणि पिवळ्या रंगाचे दिसते. याने फक्त शारीरिक नाही तर मानसिक फायदेसुद्धा होतात. याने तुमचे मन प्रसन्न राहाते. आणि तुमच्या स्वभाव मृदू होतो. खोकल्यावर अंजीर खूप गुणकारी आहे.

आता पाहूया अंजीर खाल्य्याने कोणते फायदे होतात ते : बद्धकोष्ठतेवर गुणकारी : तीन ते चार पिकलेले अंजीर दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. असे जर तुम्ही नियमित केलेत तर फायदा होईल. दुध आवडत नसल्यास पाण्यात रात्री अंजीर भिजत टाका आणि सकाळी वाटून घेऊन त्याचे सेवन करा.

ज्यांना अस्थमा कफसह असतो त्यांच्यासाठी अंजीर खाणे चांगले असते नियमित अंजीर खाल्ले तर कफ बाहेर पडून खूप आराम वाटेल. दोन ते चार अंजीर दुधात गरम करून सकाळ संध्याकाळ घेतल्याने अस्थमाचा त्रास कमी होईल. याने शरीरात नवीन उर्जा निर्माण होते.

जर नेहमी तुम्हाला सर्दीचा त्रास होत असल्यास अंजीर खाणे लाभदायक आहे. पाण्यात अंजीर उकळून घ्या आणि ते पाणी गळून घेऊन गरम गरमच प्या. असे सकाळ संध्याकाळ केल्याने नक्की फायदा होईल. कंबरदुखी : जर कोणत्याही कारणाने कंबर सतत दुखत असेल तर अंजीर साल, सुंठ आणि कोथिंबीर सम प्रमाणात घेऊन कुटून घेऊन रात्री पाण्यात भिजवा. सकाळी याचा रस गाळून प्यायल्याने कंबरदुखी कमी होईल.

जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर अंजीर खूप उपयुक्त आहेत.. पाण्यात अंजिराच्या झाडाच्या सालांची पेस्ट तयार करून याचा लेप डोक्याला लावण्याने डोके दुखणे थांबते. पाइल्स : मुळव्याध किंवा पाईल्सचा त्रास तुम्हाला होत असेल तर तीन ते चार सुखे अंजीर रात्री पाण्यात घालून सकाळी अंशपोटी खाल्य्याने पाइल्सचा त्रास कमी होतो.

याने शरीरात रक्त वाढते आणि रक्तासंबंधी विकार दूर होतात. १० मनुके आणि ८ अंजीर २०० मिली दुधात उकळून त्याचे सेवन केल्याने शरीरात रक्त वाढते. दोन अंजीर अर्धे कापून रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी हे पाणी प्या. असे नियमित केल्याने तुमच्या शरीरात रक्त वाढ होईल.

अंजिरात मोठ्या प्रमाणात केल्शीयम असते याने तुमची हाडे मजबूत होतील. हायपरटेन्शन वर गुणकारी : हायपरटेन्शन वर गुणकारी आहे अंजीर. यात पोतेशीयम चे प्रमाण भरपूर असल्याने हायपरटेन्शन कमी होते.

नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.

अंजीराची किंमत : इतर सुकामेवा प्रकारासारखा अंजीर खूप महाग नसतो. आकारावर आधारित याची किंमत ८०० रुपये किलो ते १००० रुपये किलो साधारण असते. खूप मोठे अंजीर १५०० रुपये किलो असतात. गुणवत्तेच्या प्रमाणे याची किंमत असते.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.