जाणून घ्या कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेचे संकेत देत आहे आपले शरीर…

निरोगी शरीर आणि बुद्धी या दोघांनाही पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. असा आहार जो प्रथिने, व्हिटॅमिन, चरबी, कार्बोहायड्रेट, लोह यासारख्या पौष्टिक तत्वांनी समृद्ध आहे. आहारात कोणत्याही प्रकारच्या पोषक तत्त्वाची कमतरता असेल, तर आरोग्याच्या संबंधित अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते. जीवनसत्त्वे ही अनेक कारणांमुळे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याची कमतरता शरीराला आजाराचे संकेत देत असते.

एम्सचे डॉ. अनुराग शाही यांच्या मते, शरीराच्या प्रत्येक भागासाठी व्हिटॅमिन आवश्यक असतात. शरीराच्या सामान्य स्वास्थ्यासाठी आवश्यक अशी जीवनसत्त्वे अन्नाद्वारे शरीरात पोहोचतात. पण जर त्यांची कमतरता असेल, तर औषधांच्या स्वरूपात ती कमी भरून काढली जाऊ शकते.

नखे आणि केस कमजोर होणे: आपले केस किंवा नखे कमजोर होण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु बायोटिनची कमतरता हे त्यापैकी एक आहे. बायोटिनला व्हिटॅमिन बी ७ म्हणून देखील ओळखले जाते. बायोटिन शरीरात अन्नाचे रूपांतर उर्जेत करण्याचे कार्य करते. जर त्याची उणीव निर्माण झाली, तर नखे नाजूक आणि कमकुवत होतात आणि केस पण गळायला आणि तुटायला लागतात तसेच पातळ होऊ लागतात.

इतर लक्षणे म्हणजे थकवा, स्नायू दुखणे, पायात पेटके येणे इत्यादि ही असू शकतात. या संदर्भात, डॉक्टरांचा सल्ला घ्या जे तुम्हाला अंड्यातील पिवळा बलक, मासे, ड्रायफ्रूट्स, पालक, ब्रोकोली, केळी, रताळे, इत्यादी बायोटिनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतील. गर्भवती महिला, धू म्र पा न करणारे किंवा म द्य पान करणारे आणि पचनसंस्थेच्या तक्रारी असणारे लोक अशा लोकांना बायोटिनच्या कमतरतेचा सर्वाधिक धोका असतो.

हिरड्यातून रक्तस्त्राव: हे आहारातील व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे एक प्रमुख लक्षण आहे. तसेच, चुकीच्या पद्धतीने तुम्ही ब्रश केलेत तरी पण हिरड्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. परंतु हिरड्यांमधून रक्तस्त्राव झाला, तर व्हिटॅमिन सी ला मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले जाते.

विशेषत: हे व्हिटॅमिन प्रतिकारशक्ती आणि जखमांना बरे करण्यास मदत करते. हे रोगप्रतिकारक म्हणून देखील कार्य करते आणि पेशींचा नाश होण्यापासून प्रतिबंधित करते. परंतु आपण हे लक्षात घेणे आवश्यक आहे, की शरीर स्वतः कधीही व्हिटॅमिन सी तयार करत नाही. ते आहारावर अवलंबून असते. म्हणून, आपल्या आरोग्यासाठी रोज ताजे फळे आणि भाज्यांचे सेवन करणे चांगले.

तोंडातील छाले आणि ओठांच्या कोपर्‍यांवर भेगा : ही सर्व देखील व्हिटॅमिनच्या कमतरतेची चिन्हे आहेत. विशेषत: तोंडातील छाले आणि ओठांच्या कोपर्‍यावरील भेगा हे व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतात. याशिवाय ते लोहाच्या कमतरतेचेही लक्षण आहे. हिरव्या पालेभाज्या, मांस, मासे, ड्रायफ्रूट्स, तसेच अक्खे धान्यपदार्थ इत्यादिचे सेवन आवश्यक आहे.

डोळ्याच्या तक्रारी: पोषक तत्वांचा अभाव असलेल्या आहारामुळे डोळ्यांची समस्या निर्माण होते. या अभावामुळे दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ, व्हिटॅमिन ए बहुधा रातांधळेपणा म्हणजेच नाइट ब्लाइंडनेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजाराशी संबंधित आहे. यामध्ये लोकांची कमी प्रकाश किंवा काळोखात पाहण्याची क्षमता कमी होत जाते.

व्हिटॅमिन ए हे रोडोडॉपिन या रंगद्रव्याचे उत्पादन करण्यासाठी डोळ्याच्या पडद्यामध्ये सापडणारे पिगमेंट आहे. जे रात्री काळोखात पाहण्यास मदत करते. याचा जर उपचार केला नाही, तर रातआंधळेपणा (रात्रीचा अंधत्व) हे जेरोफथेल्मिया मध्ये रूपांतरित होऊ शकते. जेरोफथेल्मिया ही एक अशी स्थिती आहे, जी कॉर्नियाला नुकसान पोहोचवू शकते आणि शेवटी अंधत्व येऊ शकते.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.