आजकालच्या मुली चांगल्या मुलाच्या शोधात आणि करीयरच्या कारणाने लग्नापासून लांब पळतात. बरेचदा मनासारखा जोडीदार मुलींना सहज मिळत नसतो. आज जमाना बदलत असल्याने या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहली यांच्या नात्याबाबत बोलायचे झाल्यास आधी अनुष्का या बंधनात राहायला तयार नव्हती. अशातच विराटने अनकेदा प्रपोज करूनही तिने होकार दिला नव्हता. खरे तर प्रत्येक मुलीच्या मनात लग्न या विषयी काही त्रास असतात आणि त्यासाठी त्या लवकर या नात्यात पडायला तयार नसतात. चला पाहूया याबाबत मुलींचे विचार काय आहेत ते.
शिक्षण महत्वाचे
हल्लीच्या मुली शिक्षणाला प्राधान्य देतात. त्यांच्या पालकांचाही त्याला आधार मिळाल्याने त्या त्यांच्या भविष्याबाबत सजग झाल्या आहेत. म्हणून त्या शिक्षणाकडे लक्ष देणे आणि त्यांची स्वप्ने साकार करणे महत्वाचे मानतात. त्या इंडिपेंडेंट होण्यावर जास्त भर देतात. आर्थिक रुपात स्वतंत्र होणे ही त्यांची प्रथम प्रायॉरिटी बनली आहे.
लग्नानंतर वाढणाऱ्या जबाबदार्या : आजही लग्नानंतर घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी सुनेवरच टाकली जाते. मान्य कि एक स्त्री ही घर सांभाळायला पूर्णपणे सक्षम असते पण सगळेच तिच्यावर ढकलून देणे हे योग्य नाही. अशात घर, मुले, माहेर, करियर, नातेवाईक यांच्याशी निगडीत सगळ्या जबाबदार्या निभावताना त्या मुलीच्या डोक्यावर त्या ओझे बनून जातात. म्हणूनच अनेकदा मुली लग्न करण्यापासून दूर पळत राहातात.
आईवडिलांचे बदलते विचार : आता पूर्वीचा काळ राहिला नाही. आई वडील मुलीवर लग्नासाठी प्रेशर न देता तिचा निर्णय तिला घेऊ देतात. तिच्या लग्नासाठी घाई करण्यापेक्षा ते तिला तिच्या पायावर उभे करण्याबाबत जास्त विचार करतात. म्हणूनच मुली त्यांचे भविष्य नीट पद्धतीने घडविण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित करू शकतात.
करियरशी तडजोड करण्याची भीती : अनेकदा लग्नानंतर घर, सासू सासरे आणि मुले यांच्या जबाबदारीमुळे मुलींना करियरशी तडजोड करावी लागते. बरेचदा अति जबाबदार्यांमुळे मुली त्यांच्या करियर आणि कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. बरेचदा यामुळे त्यांची करियरमधली ग्रोथ थांबते. अनेकदा लग्नानंतर सुनेला नोकरी सोडण्यास सांगितले जाते आणि हेच कारण आहे ज्यासाठी मुली लग्नाचा विषय टाळतात.
योग्य जोडीदाराचा शोध : मुलांच्या तुलनेत लग्नानंतर मुलींच्या जीवनात खूप बदल होतात. मुलींना अशा जोडीदाराचा शोध असतो जो सगळ्या प्रकारे तिची साथ देईल. बरेचदा अनेक मुलगे सपोर्टिंग नसतात ज्यामुळे मग मुलींच्या करियरमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा मुलांना वाटते कि सगळ्या जबाबदार्या मुलीच्याच असतात. अशा मुलांना लहानपणी काम शिकवले नसेल तर आणखी अडचण निर्माण होते. आजच्या काळात मुलींना असा जोडीदार हवा असतो जी इंडिपेंडेंट विचारांचा असून प्रत्येक कामात बायकोची साथ देईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.