तुमच्या घरात तुळस आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवा नाहीतर….

आजच्या या बातमीत आपण जाणून घेणार आहोत, की आपल्या घरात जर तुळशीचे रोप असेल, तर चुकूनही या गोष्टी करू नका. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या चुका करायच्या नाहीत: तुळस ही कोठेही होणारी वनस्पति आहे. त्यात पांढरी व काळी तुळस असे दोन प्रकार आहेत. दूध जसे पोषणासाठी अमृताप्रमाणे आहे, तसेच तुळशीचा औषध म्हणून उपयोग केला जातो. ती तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढवते आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते.

नेहमी लोक काहींना काहीतरी चुका करतात, आणि त्यांना त्याची शिक्षा मिळते. कारण लोकांना माहीतच नसते की आपण काय चूक केली आहे. जर तुमच्या घरात लावलेले तुळशीचे रोप असेल तर चांगले आहे. तुळशीच्या रोपामुळे आजार नाहीसे होतात. असे मानले जाते, की तुळशीच्या रोपामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि आजार आपल्यापासून दूर राहतात. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीची पाने एकादशी, रविवार आणि मंगळवारी तोडू नयेत.

जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले, तर त्याला लवकरच नदीत विसर्जित करून टाका. तुळशीचे रोप घरात नेहमी हिरवेगार आणि टवटवीत असले पाहिजे. तुळशीचा उपयोग पूजेसाठी करतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, की भगवान शिवाची पुजा करताना तुळशीचा उपयोग कधीही करू नये. असे केल्यामुळे शिवाच्या पूजेचे फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुळस ही भगवान विष्णुना प्रिय आहे.

तुळशी हे असे रोप आहे, की जे घरात असल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहाते. कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ति घरात प्रवेश करूच शकत नाहीत. म्हणूनच, शास्त्रानुसार असे मानले गेले आहे की, तुळशीची पाने या दिवशी तोडू नयेत. ते दिवस म्हणजे, एकादशी, रविवार आणि सूर्य ग्रहणाचा कालावधी. असे केल्याने तुम्हाला पाप लागते. तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

जर तुमची इच्छा असेल की तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा राहावी, तर तुम्ही रोज संध्याकाळी तुळशीत दिवा व उदबत्ती लावा. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. असे केल्यामुळे, घरात नेहमीच महालक्ष्मीची कृपा राहील. महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. घरातील वातावरण देखील प्रसन्न राहील. तुळशी घरात किंवा अंगणात असल्यामुळे, कितीतरी प्रकारचे वास्तुदोष नाहीसे होतात आणि परिवाराच्या आर्थिक स्थितीवर उत्तम परिणाम होतो.

आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला संजीवनीची उपमा दिली गेली आहे. हेच कारण आहे, की ती वापरताना कधीही चावू नये, तर तुळशीची पाने गिळून टाकावी. अशी मान्यता आहे की, तुळशीमध्ये असे धातू असतात, जे आपल्या दातांना नुकसान करू शकतात. म्हणून, हे पाने कधीही चावून खाऊ नयेत.

तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे घरात सुख-शांती वास करते.  तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत. तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.