फक्त ५ रुपये होता, मुकेश अंबानी यांच्या मुलांचा पॉकेट मनी, मित्र म्हणायचे अंबानी आहे की भिकारी…

मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी कुटुंबाकडे इतकी संपत्ती आहे की त्यांच्या मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. तरीही, अंबानी कुटुंबातील मुलांचे पालनपोषण अशा पद्धतीने झाले आहे, हे जाणून घेतल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हे खरे आहे, की अंबानी कुटुंब या देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. असे असूनही अंबानी कुटुंब हे मध्यमवर्गीयांच्या मूल्यांचे महत्त्व जाणतात.

ज्याप्रमाणे धीरूभाई अंबानींनी आपल्या मुलांचे संगोपन केले, अगदी त्याच पद्धतीने मुकेश अंबानी यांनीही आपल्या मुलांचे पालनपोषण काटेकोर पद्धतीने केले. मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या, की जेव्हा मुलं लहान होती, तेव्हा मुकेश अंबानी दर शुक्रवारी त्याना फक्त पाच रुपये देत असत. त्यांना हे पैसे त्यांच्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये खर्च करण्यासाठी मिळायचे.

नीता अंबानींनी सांगितले, की एक दिवस त्यांचा धाकटा मुलगा अनंत धावत त्यांच्या बेडरूममध्ये आला होता, त्याला खूप राग आला होता. त्याने त्यांना सांगितले, की आता त्याला ५ रुपये नाही, तर १० रुपये पाहिजेत. अशा परिस्थितीत नीता अंबानी यांनी त्याला विचारले, की १० रुपये कशासाठी हवेत, तर त्यावर अनंतने त्याना जे उत्तर दिले ते ऐकून त्यांना खूप हसू आले.

याबाबत नीता अंबानी म्हणाल्या की, अनंतने त्यांना सांगितले की त्याच्याजवळ असलेले ५ रुपयाचे नाणे पाहून, त्याचे मित्र हसतात आणि त्याची चेष्टा करतात. मित्र त्याला म्हणतात, अंबानी आहे की भिकारी. हे ऐकल्यानंतर नीता अंबानीसमवेत मुकेश अंबानी पण खूप हसले होते.

आयव्हीएफ तंत्रज्ञानाने जन्म मुकेश अंबानी यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव आकाश अंबानी आणि धाकटा मुलाचे नाव अनंत अंबानी आहे. त्यांच्या मुलीचे नाव ईशा अंबानी असे आहे. आकाश अंबानी आणि ईशा अंबानी हे दोघे जुळी भावंड आहेत. त्यांचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे. डॉक्टरांनी नीता अंबानी यांना सांगितले होते, की त्या आई होणे शक्य नाही. हेच कारण आहे की आयव्हीएफ तंत्राची मदत अंबानी कुटुंबियांनी घेतली होती. नंतर, लहान मुलगा अनंतचा जन्म नैसर्गिक पद्धतीने झाला.

अंबानी कुटुंबीयांनी आपल्या मुलांना श्रीमंतीची हवा लागू दिली नाही. संपत्तिचा गर्व त्यांच्या डोक्यात शिरू नये, यासाठी, नीता अंबानी यांनी आपल्या मुलांना अतिशय शिस्तीने वाढवले आहे. स्वतः नीता अंबानीही असेच शिस्तबद्ध नियमांचे पालन करतात, ज्यामुळे त्यांची मुलेही त्यांचे अनुकरण करतील.

९० ते ४७ किलो: नीता अंबानीने सांगितले, की एकदा त्यांचे वजन खूप वाढले होते. त्याचे वजन ९० किलो झाले होते. त्यावेळी, त्यांनी एक डाइट चार्ट तयार केला. त्यांनी पूर्ण काटेकोरपणे आणि नियमित त्याचे पालन केले. त्यांनी दररोज एक ते दिडतास व्यायाम केला. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे ९० किलो वजन कमी करून ४७ किलो वर आणले.

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी रिलायंस जियो मध्ये काम करतात. ते कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये आहेत. छोटा मुलगा अनंत अंबानी याला सुद्धहा मुकेश अंबानी यांनी जियो प्लेटफार्मच्या मदतीला घेऊन त्याच्याशी त्याला जोडून ठेवले आहे. तो जियो मध्ये डायरेक्टरच्या पदावर काम करतो आहे.

एक वेळ अशी होती, की अनंत अंबानी खूपच लठ्ठ दिसायचे. त्यानंतर, त्यांनी स्वत:चे वजन कमी केले. यासाठी ते खूपच चर्चेत होते. आईपीएल मॅचच्या दरम्यान अनंत अंबानीना लोकांनी मुंबई इंडियंस संघाचा उत्साह वाढवताना खूप वेळा बघितले आहे. बॉलीवुड सेलिब्रिटीजबरोबर पार्टी करताना पण ते दिसले आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.