चुकूनही करू नका अशा प्रकारचे भोजन, आई अन्नपूर्णा तुमच्यावर रागावेल आणि भोगावे लागतील वाईट परिणाम

आई अन्नपूर्णा यांना अन्नाची देवी असा दर्जा देण्यात आला आहे. धर्मशास्त्रानुसार, आई अन्नपुर्णेचा आशिर्वाद ज्या घरावर असतो, त्या घरात अन्न आणि पैशाची कमतरता कधीच होत नाही. म्हणूनच, हे खूप जरूरी आहे, की आई अन्नपुर्णेचा आशिर्वाद तुमच्यावर सतत राहील. आई अन्नपुर्णेला प्रसन्न करणे खूपच सोपे आहे आणि तिची पूजा केल्याने, तसेच खाली दिलेले उपाय करून तुम्ही आईचा आशिर्वाद मिळवू शकता.

आई अन्नपूर्णेला अशाप्रकारे करा प्रसन्न: आई अन्नपूर्णा ही धान्यात विराजमान असते, म्हणून आपण अन्नाची पूजा करावी. जेव्हा जेव्हा आपण अन्नाचे सेवन करतो, तेव्हा प्रथम हात जोडून त्याची पुजा करा आणि त्यानंतरच आपले भोजन सुरू करा. आपल्याकडे भोजनापूर्वी श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. गोरगरिबांना अन्नदान केल्याने आई अन्नपूर्णेचे पोट भरते. स्वयंपाकघर नियमित स्वच्छ ठेवा.

धान्याच्या डब्यात नेहमी एक रुपयाचे नाणे टाकून ठेवा: वर नमूद केलेले उपाय केल्यास आई अन्नपूर्णेचा आशिर्वाद तुमच्यावर सतत राहील आणि घरात कधीही धान्याची कमतरता भासणार नाही. तर, आई अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ नये, यासाठी, खाली नमूद केलेल्या चुका करू नका:

आई अन्‍नपूर्णा त्याच घरात वस्ती करते, जे घर स्वछ असते. म्हणूनच, तुमच्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. तसेच, स्वयंपाकघर कधीही अस्वछ ठेवू नका. स्वयंपाकघरात जर अस्वछता असेल, तर आई अन्‍नपूर्णा रागावते आणि घरात अन्नधान्याची कमतरता होऊ लागते.

पलंगावर बसून कधीही भोजन करू नका. असे केल्याने आई अन्‍नपूर्णा दु:खी होतेच, पण राहू पण अप्रसन्न होतो. शास्त्रानुसार अंथरुणावर भोजन ठेवल्यामुळे अन्नाचा अपमान होतो. म्हणून, तुम्ही कधीही पलंगावर बसून भोजन करू नका. भोजन हे नेहमी जमिनीवर बसून करणे उत्तम मानले जाते.

बरेच लोक भोजनाच्या प्लेटमध्ये जास्त प्रमाणात अन्न वाढून घेतात आणि ते पूर्ण खाऊ शकत नाहीत. ज्यामुळे ते अन्न वाया जाते आणि त्याचा कोणीही काही उपयोग करू शकत नाही, कारण ते उष्टे असते. म्हणून आपल्याला आवश्यक असेल व आपण खाऊ शकतो, तितकेच अन्न प्लेटमध्ये वाढून घ्या.

कधीही कोणालाही आपले उष्टे जेवण खाऊ घालू नका. जेव्हा आपण एखाद्याला भोजन देता, तेव्हा ते ताजे द्या. उरलेले अन्न कधीही टाकू नका. वस्तुस्थिती ही आहे, की बरेच लोक जास्त असलेले अन्न टाकून देतात, जे अजिबात योग्य मानले गेलेले नाही. जेव्हा जास्तीचे अन्न शिजले असेल, तेव्हा ते एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा प्राण्याला खायला द्या.

जेवण झाल्यावर बरेच लोक प्लेटमध्ये आपले हात धुतात. जे योग्य मानले जात नाही. जेवणाच्या प्लेटमध्ये हात धुतल्यामुळे चंद्र आणि शुक्र क्रोधित होतात. एवढेच नव्हे तर तो अन्नपुर्णेचा अपमानही समजला जातो. तर ही सवय जर आपल्याला असेल तर ती ताबडतोब बदलून टाका.

जर तुम्ही या गोष्टींचे अनुसरण केले, तर आई अन्नपूर्णेचा आशिर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.