सीता नाही तर रावणाची पत्नीच होती त्याच्या मृ त्यु चे मोठे कारण, जाणून घ्या कसे ?

रामायणाच्या काळात पूर्ण जगात रावणाचाच डंका वाजत होता, कारण तो होता पण तेवढाच शक्तीशाली. ही गोष्ट श्रीरामाच्या जन्मापूर्वीची आहे, जेव्हा कोणीही राजा रावणाचा मुकाबला करू शकत नव्हता. रावण हा मनुष्य आणि देवता यांच्यापेक्षा मोठा होता. म्हणूनच, त्याने सर्वप्रथम महादेवाची घोर तपस्या केली, आणि सर्व शक्तीशाली आयुधे म्हणजेच हत्यार प्राप्त करून घेतली होती. वरदान मिळाल्यानंतर रावणाला कोणत्याही प्रकारचे भय उरले नव्हते. कारण, त्याचा मृ त्यू सहजपणे होऊच शकत नव्हता. तर दुसरीकडे, त्याच्याकडे विशाल आणि ताकदीची सेना होती.

मनुष्य असो किंवा राक्षस सगळ्यांना एक ना एक दिवस मृ त्यू येतोच. रावणाने अमर होण्यासाठी त्याचे दोन्ही भाऊ कुंभकर्ण आणि बिभीषण यांच्यासह खूप वर्षे तपस्या केली, ज्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावण स्वत:ला अमर बनवू इच्छित होता. परंतु, ब्रह्मदेवाना माहीत होते, जर रावण अमर झाला, तर तो सर्व संसार व सृष्टी नष्ट करेल. म्हणूनच, त्यांनी रावणाचे प्राण त्याच्या बेंबीत स्थापन करून ठेवले आणि एक बाण दिला, ज्यामुळे त्याचा मृ त्यू होऊ शकेल.

तो बाण रावणाने लंकेच्या दरबाराच्या सिंहासनाच्या समोरील खांबामध्ये लपवून ठेवला होता. ही गोष्ट बिभिषण आणि रावणाची पत्नी मंदोदरी या दोघांना माहीत होती. आता रावण पुर्णपणे निश्चिंत झाला होता, अहंकारामुळे स्वत:ला पूर्ण जगाचा सृष्टीचा ईश्वर मानायला लागला होता.

सीतहरणाच्या वेळी त्याचा भाऊ बिभीषण याने त्याला समजावून सांगितले होते, त्याने माता सीतेला श्रीरामाकडे परत पाठवून द्यावे. हे एकूण रावणाचा अभिमान जागा झाला आणि त्याने त्याच्या भावालाच राज्याच्या बाहेर हाकलून दिले.

बिभीषण यांची भेट हनुमानाशी झाली आणि हनुमानद्वारा ते श्रीरामाचे भक्त झाले. युद्धाच्यावेळी श्रीरामानी रावणावर कितीतरी प्रहार केले., परंतु तो मरुन परत जीवंत होत होता. तेव्हा श्रीरामाला बिभीषणाने सांगितले, की त्याला ब्रह्माच्या वरदानामुळे एक बाण मिळाला आहे आणि त्याच बाणाने त्याचा मृ त्यू होऊ शकतो. बिभीषणाने असे सांगताच, हनुमानाने जराही उशीर न करता, सूक्ष्म रूप धारण करून लंकेत प्रवेश केला. परंतु, बाण कुठे ठेवला आहे, याची माहिती फक्त मंदोदरीला होती.

हनुमानाने ब्राह्मणाचे रूप घेऊन मंदोदरीकडून ते गुपित जाणून घेतले आणि तो खांब तोडून बाण घेऊन लवकरच श्रीरामाकडे आला आणि त्या बाणानेच रावणाचा मृ त्यू झाला. जर मंदोदरीने ते गुपित सांगितले नसते, तर रावणाचा मृ त्यू असंभव होता.

जर तुम्हाला अशी न ऐकलेली पौराणिक कथा वाचणे आवडत असेल, तर खाली दिलेल्या फॉलो आणि लाइक बटनाला क्लिक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.