जिरा पाणी सेवन करण्याचे हे आहेत फायदे, फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं कराल तयार!

आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त स्वाद वाढवत नाहीत तर ते स्वास्थ्यपूर्ण देखील आहेत. तुम्ही जिरा राईस आवडीने खात असाल पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेत का? जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे स्वास्थ्यासंबंधिच्या अनेक समस्या दूर होतील. जिरे शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज आहारात जिऱ्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक लाभ मिळतील.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण सारे अनेक समस्याने त्रस्त असतो. अनेक चढ उतार आपल्या आयुष्यात होत असतात. या सगळ्या त्रासाचा परिणाम कळत नकळत आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी एका आयुर्वेदिक मसाले पदार्थ बद्दल सांगणार आहोत. असा पदार्थ जो दिसायला जरी लहान असला तरी त्याचे कार्य महान आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल…

एक मोठा चमचा एक कप भर पाण्यात रात्री भिजवून ठेवा. सकाळी भिजवलेले जिरे उकळा आणि गरम गरम चहा प्रमाणे प्या. उरलेले जिरे चावून खा.अश्या पद्धतीने प्यायल्यास अतिरिक्त चरबी पासून तुम्हाला मुक्तता मिळेल तसेच हे नियमित केल्यास शरीरातील चरबी सुद्धा वाढणार नाही. जिरेची पावडर बनवून ती खाल्ल्यास पोटाशी संबंधातील जे काही आजार असतात ते लवकरच बरे होतात आणि तुम्हाला लवकर आराम मिळतो.

जिरे हे आपल्या शरीरात जे काही विषारी घटक असतात त्यांना शरीराबाहेर टाकण्याचे काम करत असते तसेच गॅस आणि पोट फुगणे व अन्नपचन न होणे इत्यादी आजारांवर जिरे रामबाण म्हणून उपचार करत असते. जर तुम्हाला जिऱ्याची चव आवडत नसेल तर तुम्ही जिऱ्याची पावडर बनवून दही सोबत खाऊ शकता.

जिरे हे आपल्या शरीरातील खराब क्लोरेस्टॉल आणि चरबीला शरीरात निर्माण होण्या पासून थांबविते तसेच हार्ट अटॅक पासून तुमचे संरक्षण करण्याचे कार्य सुद्धा जिरे करते. नुकताच केल्या गेलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, नियमितपणे जिरे चे सेवन करणाऱ्या व्यक्तींना हृदयासंबंधित कोणतेही आजार होत नाहीत आणि त्यांचे आरोग्य नेहमी निरोगी राहते.

जिऱ्याच्या पाण्याने शरीरामध्ये एन्झाइम्स सक्रीय होतात, ज्यांच्यामुळे साखर, कर्बोदके आणि फॅटस् व्यवस्थित पचविली जातात. शरीराचे पचनकार्य सुधारले, की शरीराची चयापचय शक्ती देखील सुधारते, जेणेकरून वजन घटण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण घटण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनामुळे भूक शमते आणि वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा देखील कमी होते. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते.

जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालावेत. जिरे भिजवून ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर अधिक चांगला. हे जिरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेऊन सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन, रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करावे.

गर्भावस्थेत असणाऱ्या महिलांनी चुकूनही जिरा पाणीचा सेवन करू नये. ज्या लोकांना जियाची अॅलर्जी असते त्या लोकांनीही जिरा पाणी पिणे टाळावे. जास्त प्रमाणात जिन्याच्या सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते . यामुळे आपल्याला लो शुगर होऊ शकतो . म्हणून जिरा पाण्याचे आणि जियाचे सेवन योग्य प्रमाणात करावे.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published.