या दोन लोकांनी कधीही करू नये कच्च्या कांद्याचे सेवन….तुम्ही पण जाणून घ्या…

स्वयंपाकघरातला कांदा (Onion) आरोग्यासाठी तसंच सौंदर्यासाठी खजिना असल्याचं मानलं जातं. जेवणात नेहमीच कांद्याचा वापर केला जातो.  कांदा हे पोषक तत्वांचे भांडार आहे, त्याचबरोबर एक औषधसुद्धहा आहे. मजूर, शेतकरी किंवा घरकामाचे गडी हे कांदा आणि मिरची चपातीबरोबर खातात, व तरीही त्यांचे स्वास्थ्य उत्तम असते. हा एक उत्तम प्रकारचा दाखला आहे, की कांदा किती गुणकारी आहे याचा.

कांद्याचा वापर जेवणामध्ये केला जातो. तसेच तो कच्चापण खाल्ला जातो. चटणी किंवा लोणचे बनवण्यासाठी सुद्धहा कांदा वापरतात. स्वादामध्ये कांदा तिखट असतो. कांदा कोणत्याही ऋतुत पिकावता येतो. ते जमिनीच्या खाली येणारे कंदमूळ आहे. कांदा हरप्रकारे शरीरासाठी आवश्यक आहे. त्यात फोलेट, आयरन, पोटैशियम आणि विटामिन-सी व बी६ हे भरपूर प्रमाणात असते. त्यात मॅग्ननीज असल्यामुळे तो सर्दी-खोकल्यापासुन आपले रक्षण करतो.

तसे कच्च्या कांद्याचे फायदे अनेक आहेत. जसे की, उन्हाळ्याच्या दिवसात कच्चा कांदा त्वचेवर घासला, तर शरीराला थंडावा मिळतो, आणि प्रखर सूर्यकिरणापासून आपले रक्षण होते. आपल्या टाचामध्ये जर भेगा पडल्या असतील, तर कच्चा कांदा त्यावर घासला तर फायदा होतो. चेहर्‍यावरील काळे डाग जाण्यासाठी कांदा रस आणि लिंबू रस चेहर्‍यावर लावावा. त्यामुळे चेहरा उजळतो.

स्त्रियांमध्ये मासिक पाळी जाण्याच्या वेळी त्यांना खूपच शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी कांदा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. मुख्यत: रजोनिवृतीच्यावेळी स्त्रियांच्या हाडांवर जास्त परिणाम होतो. अशावेळी, कांद्याचा रस सेवन केल्याने त्यांच्या हाडांची घनता व मजबूती कायम राहाते.

दुनियेत अशी खूप लोक आहेत, जे कच्च्या कांद्याचे सेवन करतात. काही लोकांना कच्चा कांदा खायला खूपच आवडतो. परंतु, ज्यांनी कच्च्या कांद्याचे सेवन करू नये, त्यांच्यासाठी कच्चा कांदा खूपच नुकसांन करणारा आहे, अशा लोकांबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. कोणासाठी कच्च्या कांद्याचे सेवन नुकसांनकारक ठरणार आहे ते बघूया :

यकृतच्या आजाराने पीडित : ज्या लोकांना यकृतसंबंधी आजार आहेत, समस्या आहेत, अशा लोकांनी कधीही कच्चा कांदा खाऊ नये, कारण या आजारात कच्चा कांदा खाल्यामुळे त्यांचा आजार आणखी वाढू शकतो.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यावर: ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्या लोकांनी कधीही कच्च्या कांद्याचे सेवन करू नये. कारण, कच्चा कांदा खाल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताची पातळी आणखी कमी होऊ शकते.

तोंडातून येणारी दुर्गंधी: ही फार मोठी समस्या नाही, पण काही लोक कांदा खाल्ल्यानंतर तक्रार करतात, की तोंडाला घाणेरडा दुर्गंध येतो. म्हणून कच्चा कांदा खाऊ नये, व खाल्लाच तर माऊथ फ्रेशनरचा उपयोग करा. म्हणजे तोंडाचा वास निघून जाईल.

पोटाला गॅस धरणे: कांदा जास्त प्रमाणात खाल्ला, तर पोटात गॅस निर्माण होतो. कारण, कांद्यामध्ये फ्रक्टोज (साखर) याची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गॅस निर्माण होतो. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.