डोळ्यांखालची काळी वर्तुळे सहज होतील दूर, फक्त या सर्वोत्तम घरगुती उपायाचा एकदा करा वापर….

डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय नाजूक आणि कोमल असते.ज्यामुळे खूप लवकरच हि त्वचा ढीली आणि काळसर होऊ लागते. याबद्दल तेव्हा माणसाला कळते जेव्हा तो हसतो किंवा डोळ्यांचा आसपासची त्वचा मध्ये सुरकुत्या दिसू लागतात आणि माणसाला वाटते कि तो म्हातारा होत आहे परंतु आयुर्वेदामध्ये डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा असते त्याला घट्ट करण्यासाठी काही आरोग्यविषयक टिप्स सुद्धा सांगण्यात आले आहे. ज्यांचा आपण सारे सहज उपाय म्हणून उपयोग करू शकतो.

खोबरेल तेलामध्ये थोडेसे बेसन , लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून हे मिश्रण डोळ्यांच्या भोवती लावावे आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करावी . आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. खोबरेल तेल आणि बदामाचे तेल सारख्या प्रमाणार घेऊन डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करावी . हे तेल रात्रभर चेहयावर राहू द्या.

टमाटर : टमाटरच्या रसामध्ये लिंबूचे रस चिमूटभर बेसन आणि हळद मिसळून घ्या. या पेस्टला आपल्या डोळ्यांच्या चार हि बाजूला लावा आणि २० मिनिट नंतर चेहरा धुवून टाका. असे आठवड्यातुन तीनदा करा. असे केल्याने डार्क सर्कल हळू हळू कमी होतील. गुलाब जल : गुलाब जलच्या सहाय्याने डार्क सर्कलच्या समस्ये पासून मुक्तता मिळते. बंद डोळ्यांवर गुलाब जलमध्ये कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवा .असे १०मिनिटे करा. असे केल्याने डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा चमकदार होते

बदामाचे तेल : काळ्या डागांपासून मुक्तता मिळवायची असल्यास बदामाचे तेल खूप उपयुक्त आहे. बदाम तेल डोळ्यांच्या आजूबाजूला लावून काही वेळ तसेच सोडा. नंतर बोटानी हलके मसाज करा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. मध आणि बदाम तेल : बदाम तेल आणि मधला एकत्र चांगले मिसळून झोपायच्या आधी आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. आणि संपूर्ण रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठुन साध्या पाण्याने धुवा. असे नेहमी केल्यास काही दिवसांतच काळे डाग नष्ट होऊन जातील.

पुदीनाची पाने : पुदीनाच्या पानांना बारीक वाटून घ्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. या पेस्टला काही काळ असेच ठेवून द्या आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे तुम्हाला काळ्या डागांपासून लवकर मुक्तता मिळेल. खीरा (काकडी) : आयुर्वेद मध्ये खीरा म्हणजे काकडी बद्दल अनेक उपाय सांगितले गेले आहे. ते त्वचेला घट्ट करण्याचे कार्य करते. तुम्ही सकाळी उठून खीरा म्हणजेच काकडीचा मसाज चेहऱ्यावर करू शकता. कोरफड : १ चमचा कोरफडच्या रसाला रोज सकाळी संध्याकाळी दोन वेळा अंघोळी नंतर आणि झोपायच्या आधी लावा. यामुळे तुमची त्वचा घट्ट होईल.

संत्रीचा रस आणि ग्लिसरीनसंत्रीचा रस मध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेसाठी लाभदायक असते. संत्रीच्या रसात काही ग्लिसरीन चे थेंब मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा व या पेस्ट ला डोळ्यांच्या आजूबाजूला लावा. यामुळे डार्क सर्कल पासून मुक्तता मिळेल जवसचे तेल : जवसचे तेल सौंदर्याशी निगडीत अनेक समस्याकरीता लाभदायक ठरते. या तेलाने डोळ्यांच्या आजूबाजूला हलक्या हातांनी मालिश करा.यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो आणि डोळ्यांना थकवा जाणवत नाही, ज्यामुळे डार्क सर्कल सारख्या समस्या नष्ट होतात.

अशी बनवा नैसर्गिक पेस्ट : एक चमचा बेसन ,एक चमचा मध, एक चमचा दूध , अर्धा चमचा तिळाचे तेल यांना एकत्रित करून पेस्ट बनवून घ्या आणि या पेस्टला सातत्याने चेहऱ्यावर लावणे गरजेचे आहे . ही पेस्ट साधारणतः चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा नंतर हलक्या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या यामुळे डोळ्याखालील काळे डाग नष्ट होतात तसेच त्वचा सुद्धा घट्ट होते.

काय करू नये : ताण – तणावामुळे डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या येणे हे हल्ली सर्वात मोठी समस्या आहे आणि त्याचबरोबर केस सुद्धा गळू लागतात या सर्वांचे कारण म्हणजे ताण- तनाव युक्त असलेले जीवन म्हणूनच जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा व जास्त वेळ टीव्ही आणि कॉम्प्युटरवर काम करणे टाळा. जर हे सारे उपाय तुम्ही अमलात आणले तर लवकरच डार्क सर्कल आणि डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सुरकुत्या नष्ट होतील.

केळे : पिकलेली केळी चुरून घ्या आणि त्यामध्ये गुलाब जल मिसळा. त्याला डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि अर्धा तासानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. बटाटे : बटाटाचा रसाला डोळ्याखाली हलक्या हाताने मसाज केल्याने काळे डाग दूर होतात. यापैकी कोणत्याही उपायाचा वापर तुम्ही करू शकता, मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.