असे म्हणतात कि प्रत्येक शिळे खाणे हे नुकसानकारक नसते, काही पदार्थ असेही असतात जे शिळे असूनही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ज्यातील एक आहे गहू. आज आम्ही तुम्हाला शिळी पोळी, शिळी चपाती खाण्याचे असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही शिळी पोळी, शिळी चपाती टाकून देण्याऐवजी खाणे पसंत कराल.
खरेतर शिळे अन्न खाऊन शरीराचे नुकसानच होते असे म्हणतात. १२ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेले अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात. मग ते इतर काही पदार्थ असोत किंवा शिळी पोळी. इतकेच नाही तर शिळे अन्न पुन्हा गरम करून खाण्याने शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते.
पण हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल कि सगळेच शिळे पदार्थ नुकसानकारक नसतात. काही गोष्टी अशा असतात ज्या शिळ्या खाल्याने शरीराला फायदा होतो ज्यातील एक आहे गहू. भारतात बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या केल्या जातात. तसेच अनेक भारतीय घरात जास्त जेवण बनवण्याची सवय असते ज्यामुळे बरेचदा पोळ्या उरतात. मग या उरलेल्या पोळ्या टाकून द्याव्या लागतात किंवा जनावरांना खाऊ घालाव्या लागतात.
दुधाबरोबर शिळी पोळी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. शिळी पोळी १० मिनिटे दुधात भिजवा आणि नाश्त्याला खा. असे केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहाते. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास नेहमी होत असेल तर हा सोपा उपाय नक्की करून पहा. आपल्या शरीराचे साधारण तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते. तापमान ४० पेक्षा जास्त असेल तर आपल्या शरीराच्या महत्वपूर्ण अवयवांना नुकसान पोहोचू शकते. दुधात भिजवलेली शिळी पोळी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवते.
जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. अनेक फिटनेस सेंटमध्ये सकाळी शिळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात. यात असणारे बॅक्टिरीया शरीर चांगलं ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.
ज्या लोकांना नेहमी पोटदुखीची तक्रार असते त्यांच्यासाठी शिळी पोळी खूप उत्तम असते. रात्री झोपण्याआधी दुधात भिजवलेली शिळी पोळी खाऊन गैस किंवा बद्धकोष्ठता यांसारखे पोटाचे विकार दूर होतात. ही पोळी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी खाऊ शकता.
सध्याच्या काळात अनियमीत जीवशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकिच्या पद्धतींमुळे एसिडिटीची समस्या अनेकांना जाणवत असते. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी दुधासोबत शिळी चपाती खा. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. तसंच अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीच्या सेवनाने अशक्तपणा कमी होतो. ज्यांना गॅस आणि पचनाच्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी शिळी चपाती हा खूप चांगला उपाय आहे. तसेच गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील फायदेशीर आहे.
डायबिटीजमध्ये शिळी पोळी खाण्याचा बराच फायदा होतो. दिवसात कोणत्याही वेळी शिळी पोळी १० ते १५ मिनिटे दुधात भिजवून खाल्ल्याने ब्लड शुगर पातळी नियंत्रणात राहाते. म्हणूनच शिळ्या पोळ्या कधीही टाकून देऊ नका, त्या दुसर्या दिवशी खाऊन तुमचाच फायदा होणार आहे.मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.