आयपीएलमध्ये बॉलिवूड स्टार्स इतक्या उत्साहाने सहभागी का होतात ? जाणून घ्या- यामागचा त्यांचा हेतु….

भारतातील क्रिकेट हा खेळ एखाद्या धर्मासारखा समजला जातो. यावेळी, कोणत्याही खेळाचे थेट प्रक्षेपण करणारे टीव्ही आणि इतर माध्यमे बघणार्‍या दर्शकांची संख्या खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे कितीतरी स्टार्स क्रिकेटच्या स्टेडियममध्ये जाऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतात. त्यांच्या सेलिब्रिटी असण्याचे या निमित्ताने खूप फायदा होऊ शकतो.

आयपीएल सामन्यादरम्यान बॉलिवूडचे अनेक कलाकार चर्चेत राहाण्यासाठी व प्रसिद्धी मिळवण्यासाठी मैदानात पोहोचतात कारण संपूर्ण सामन्यादरम्यान बर्‍याचश्यावेळा कॅमेरा हा बॉलिवूड सेलिब्रिटींनवर फिरत असतो. सतत सेलिब्रिटी दिसत असतात. यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे लोकांच्या नजरेसमोर राहण्याचा फायदा होतो, त्याचबरोबर प्रसिद्धी मिळते. स्वत:ची आवड पण त्या निमित्ताने जोपासता येते.

आपल्याला सांगतो की, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे चित्रपटांमध्ये अभिनय तर करतातच पण त्याशिवाय इतर व्यवसाय पण करतात. या चित्रपटातील सेलिब्रिटींसाठी आयपीएल हा व्यवसाय करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. या आधी आपणा सर्वांना माहीतच आहे, की अनेक सेलिब्रिटी खेळाडूंवर तसेच मॅच जिंकण्या हरण्याच्या निर्णयावर पैसे लावतात.

प्रेम: पण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असेही बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांना या खेळाबद्दल खरोखर खूप प्रेम आहे, म्हणून ते आपल्या आवडत्या टीमला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवरही येतात. प्रत्येक क्षेत्रात खेळाबद्दल खरे प्रेम असलेले चाहते असतात, त्याचबरोबर अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धहा खेळ हे माध्यम स्वीकारले जाते.

त्या सेलिब्रिटीमध्ये उद्योगपती नीता अंबानी, शाहरुख खान तसेच प्रीती झीन्टा यासारखे कलाकार आहेत. शाहरुख खान : बॉलिवूडचा किंग खान व्यतिरिक्त आयपीएल टीमकडे कोलकाता नाईट रायडर्स ही फ्रँचायजी सुद्धा आहे. तथापि, त्यांची भागीदारी फक्त एकट्याची नाही, तर जूही चावला आणि तिचा नवरा जय मेहता यांच्याबरोबरही आहे. या टीमचे प्रशिक्षक जॅक कॅलिस आहेत. शाहरुख खान हे सुद्धहा बॉलीवूड मधील नावाजलेले नाव असल्यामुळे ते टीमला प्रोत्साहित करताना आपल्याला दिसतात.

प्रीती झिंटा : प्रीती झिंटा ही ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाची मालकीण आहे. त्यांच्या भागीदारीत नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल यांचाही समावेश आहे. ती एक बॉलीवूड सेलिब्रिटी असल्यामुळे, सामन्या दरम्यान प्रीती बर्‍याचदा तिच्या टीमला प्रोत्साहित करताना दिसते.

नीता अंबानी : नीता अंबानीचा थेट बॉलीवूडशी काही संबंध नाही, परंतु बर्‍याचदा तिला चित्रपटातील कलाकारांसोबतही पाहिले जाते. नीता अंबानी ‘मुंबई इंडियन्स’ टीमची सह-मालक आहे आणि बर्‍याचदा मैदानावर टीमचा उत्साह वाढवताना आणि त्यांना प्रोत्साहन देताना नीता अंबानी दिसते. नीता अंबानी सामाजिक कार्यात आघाडीवर आहे, पण आयपीएलच्या निमित्ताने खेळाच्या माध्यमातून ती सामाजिक बांधिलकी जपते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *