काही लोक द्रौपदीला इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री मानतात, तर काही लोकांचे असे म्हणणे आहे, महाभारत होण्याचे मुख्य कारण द्रौपदीच आहे. द्रौपदी ही महाभारतातील एक मुख्य स्त्री आहे.द्रूपद राजाची मुलगी म्हणून तिचे नाव “द्रौपदी”. द्रौपदी ही भूमिकन्या आहे.
द्रौपदीचे जीवन समजून घेणे खूप कठीण आहे. फक्त तिचा सखा, भाऊ, कृष्ण यानेच फक्त तिला समजून घेतले व वेळोवेळी तिच्या मदतीला तो धावून गेला. पांडू पुत्र अर्जुनाने द्रौपदीला स्वयंवरात जिंकले, पण कुंतीच्या सांगण्यावरून द्रौपदीला पाच पांडवांशी लग्न करावे लागले होते. पण हे लग्न जर तिने केले नसते, तर आज कदाचित महाभारत घडलेच नसते, असे लोकांचे मत आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला द्रौपदीने सांगितलेल्या चार महत्वपूर्ण गोष्टीच्या बद्दल सांगणार आहोत, जी प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवली पाहिजे.
पतीला वश करून घेणे : असे खूप वेळा बघितले गेले आहे, की लग्नानंतर प्रत्येक स्त्री आपल्या पतीला तिच्या म्हणण्यानुसार वागायला भाग पाडते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, प्रत्येक स्त्री आपल्या पतीला आपल्याकडे वश करून घेण्याचा प्रयत्न करते.
त्याने तिचे सगळे ऐकले पाहिजे, असा तिचा अट्टहास असतो. परंतु, द्रौपदीने सांगितले आहे, की स्त्रियांनी असा विचार कधी मनात आणू नये. असा विचार केल्यामुळे त्यांचा योग्य रीतीने चाललेला घरसंसार उध्वस्त होऊ शकतो. पतीला वश करण्याच्या नादात त्या परिवरातील सदस्यांना मात्र दुखवतात.
नवरा हेच सर्वस्व : द्रौपदीच्या म्हणण्याप्रमाणे एका पतिव्रता स्त्रीचा नवराच तिच्यासाठी सर्वस्व असतो. तिने कोणत्याही परिस्थितीत म्हणजे सुख दू:ख दोन्ही स्थितीत पतीची साथ द्यायला पाहिजे. म्हणून, स्त्रियांना कठिणात कठीण परिस्थितीत न घाबरता आपल्या पतीची सदैव साथ दिली पाहिजे. तरच संसार सुखी होऊ शकतो.
घरगुती गोष्टींची चर्चा : कोणत्याही स्त्रीने आपल्या घरगुती गोष्टींची चर्चा कोणत्याही परक्या माणसांबरोबर करू नये. स्त्रियांबरोबर तर नाहीच नाही. अगदी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींशी याबद्दल कधीही बोलू नये. बाहेरच्या व्यक्ति एक तर त्याचा फायदा घेतील किंवा चेष्टा करतील. सगळीकडे तुमच्या घरातील कलह पोहोचवतील. त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी दुसर्यांना समजतील. पण त्यावर तुम्हाला कोणीही काहीही उपाय न सुचवता फक्त तुमचा फायदा घेतील किंवा थट्टा करतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.