आजार अनेक उपचार एक…जाणून घ्या हिरवीगार पाने असणाऱ्या मुळ्याचे जादुई फायदे…

बाजारात पांढर्‍या हिरव्या मुळ्यांचे ढीग दिसू लागले आहेत. कोशिंबीर असो किंवा भाजी, प्रत्येक घरात मुळा नक्कीच वापरला जातो. तुम्ही सुद्धहा मुळा भरपूर खा, कारण हा आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी दोन्हीसाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या मुळ्याचे १३ अनमोल फायदे- घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.

आपल्या कोशिंबीरीत असलेला मुळा हा प्रथिने, जीवनसत्व अ, जीवनसत्व बी, सी, आर्यन, आयोडीन, कॅल्शियम, गंधक, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, क्लोरिन या सर्व घटकांनी समृध्द आहे आणि ही सर्व पोषक तत्वे एकत्र आली की आपले आरोग्य उत्तम ठेवतात आणि आजारांपासून आपले रक्षण करतात. शारीरिक थकवा किंवा वेदना झाल्यास मुळा खाणे किंवा त्याचा रस पिणे फायदेशीर ठरते. घशात जर वेदना होत असेल किंवा सूज येत असेल तर मुळ्याच्या रसामध्ये सैंधव मीठ मिसळून गरम पाण्यात मिसळा आणि त्याच्या गुळण्या करा. यामुळे घसा चांगला शेकला जाईल आणि सूज कमी होईल.

मुळा आपली भूक वाढवतो आणि आपल्या पचनतंत्राला अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. रिकाम्या पोटी मुळ्याचे तुकडे सेवन करणे हे गॅसच्या समस्येमध्ये फायदेशीर आहे. मुळा हा लठ्ठ रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यासाठी मुळ्याच्या रसामध्ये लिंबू आणि सैंधव मीठ मिसळा व त्याचे सेवन करा. त्याच्या सेवनाने लठ्ठपणा हळूहळू कमी होऊ लागतो. दम्याच्या रूग्णांनाही मुळ्याच्या रसाचा काढा पिणे फायदेशीर आहे.

मुळा रस आणि कच्चा मुळा हे मूत्रपिंडाच्या समस्यांसाठी रामबाण उपाय आहेत. मुळ्याच्या रसामध्ये सैंधव मीठ घालून नियमित घेतले तर मूत्रपिंड समस्या दूर होते आणि मूत्रपिंडांतील खडे विरघळून जातात. मुळ्याचा रस कोणत्याही प्रकारच्या मूत्र रोगात किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आजारात फायदेशीर आहे. मुळा हा मूत्रमार्गाच्या हानिकारक घटकांना दूर करून, जंतुसंसर्गाला प्रतिबंध करतो आणि जळजळ, सूज आणि इतर समस्या नष्ट करतो.

दातांची कोणतीही समस्या किंवा दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यासाठी, मुळ्याच्या छोट्या तुकड्यांमध्ये लिंबाचा रस घाला व त्याने दात घासून घ्या किंवा तुकडे थोडा वेळ चावून खा आणि मग ते थुंकुन टाका. अशा प्रकारे, दातांचे पिवळेपण कमी होईल. मुळ्याच्या रसाने चुळा भरल्याने दात स्वच्छ होतात व दात मजबूत होतात.

मुळा रोज जेवणात वापरल्याने यकृत आणि मूत्रपिंड निरोगी आणि मजबूत राहतात. मुळा हा बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधीवर देखील एक प्रभावी उपाय आहे. मुळा हा पोटाच्या प्रत्येक समस्येवर उपायकारक आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी खूप जरुरीचे आहे. मुळा हे फक्त झोप न येण्याच्या समस्येपासून मुक्त करतो असे नाही तर तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी मदत करतो.

त्वचा डागविरहित, कोमल आणि मऊ करण्यासाठी त्वचेवर मुळ्याच्या पानांचा रस लावा. याशिवाय तुम्ही पेस्ट बनवूनही लावू शकता. ही पेस्ट कोरड्या त्वचेला आराम देईल आणि त्वचेला निरोगी बनवेल. आपण सतत उचकी या समस्येने त्रस्त असल्यास, मुळ्याची पाने आपल्याला मदत करू शकतात. मुळ्याची मऊ पाने चघळल्यामुळे लगेचच उचकी थांबेल. इतकेच नाही तर तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळेल.

रक्ताभिसरण नियंत्रित करण्याच्याबाबतीतही मुळा हा अग्रेसर आहे. हा कोलेस्टेरॉल कमी करतो आणि रक्तदाब पण नियंत्रित करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी मुळा हा सर्वोत्तम औषध आहे. मुळ्यामध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असल्यामुळे आपली हाडे मजबूत करण्यास मदत करतो. हा खाल्ल्याने सांधेदुखी आणि सूज दूर होते.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *