रात्रीत भेगा पडलेल्या टाचांपासून मिळवा सुटका, करून पहा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय…

फक्त, नारळाचे तेल नाही, तर ऑलिव ऑईलसुद्धा टाचांना मऊ व मुलायम बनविते. हातावर थोडे तेल घेऊन त्या तेलाने टाचांना मालीश करा. नंतर, अर्ध्या तासासाठी पायांना मोकळे ठेवा. असे आठवड्यातून एकदा केल्यामुळे काही दिवसात भेगा पडलेल्या टाचा कोमल होऊन जातील.

थंडीचा काळ तसा तर खूपच छान वाटतो, पण तुमच्या त्वचेसाठी हा ऋतु अनेक त्रासांना आमंत्रण देतो. थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होऊन त्याला भेगा पडायला लागतात. फक्त ओठ आणि त्वचा नाही, तर त्याचा प्रभाव टाचांवरही होतो. परंतु, आपण त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही. चेहर्‍यावर तर तुम्ही मॉइश्चराइज़र आणि कोल्ड क्रीम लावून घेता, परंतु, टाचांचे काय? जर, थंडीत तुमच्या टाचांना भेगा पडत असतील, तर या घरगुती उपायांचा उपयोग करा, व बघा तुमच्या टाचा अत्यंत मऊ आणि मुलायम होतील.

नारळाचे तेल : केस आणि त्वचेसाठी नारळाचे तेल हे एक वरदान आहे. नारळाचे तेल भेगा पडलेल्या टाचांच्या समस्येवर आराम देते. तुम्हाला पाहिजे असेल तर, तुम्ही नारळाचे तेल थोडेसे कोमट करून भेगा पडलेल्या टाचांवर लावू शकता. टाचांवर चांगल्या प्रकारे मालीश केल्यानंतर मोजे घालून झोपा, आणि सकाळी उठल्यावर पाय धुवून टाका. १० दिवस हा उपाय केल्यावर तुमच्या कोरड्या टाचा मऊ होतील आणि तुम्ही न घाबरता उंच टाचेच्या सॅंडल वापरू शकता.

मध : कदाचित आपण खूप वेळा चेहर्‍यावर मध लावला असेल, कारण मध हा एक उत्तम मॉइश्चराइजरचे काम करतो. म्हणूनच, भेगा पडलेल्या टाचांसाठी मध खूपच फायदेशीर आहे. एका अशा भांड्यात पाणी घ्या, ज्यात तुम्ही आपले पाय बुडवू शकाल. या पाण्यात अर्धा कप मध मिसळून त्यात काही वेळासाठी पायांना बुडवून ठेवा. कमीत कमी २० मिनिटांनी पाय बाहेर काढा व पुसून घ्या आणि मोजे घालून झोपा. काही दिवस हा उपाय सतत केल्याने, तुमच्या टाचा मऊ व मुलायम होतील.

टाचांना पडलेल्या भेगांपासून सुटका करून घ्यायची असेल तर तुम्ही एक सहज सोपा उपाय ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला मेणबत्तीची गरज लागेल. जाणून घेऊयात मेणबत्तीच्या सहाय्याने पायाच्या टाचेला पडलेल्या भेगा दूर करण्याबाबत…सर्वात आधी मेणबत्तीची वात काढून टाका. त्यानंतर खोबऱ्याचं किंवा बदामाचं तेल एका भांड्यामध्ये ओतून गरम करून घ्या. यानंतर मेणबत्ती टाकून व्यवस्थित वितळवून घ्या. तेलामध्ये मेण व्यवस्थित वितळल्यानंतर गॅसवरून उतरवून घ्या. थंड झाल्यानंतर हे मिश्रण व्हॅसलिनप्रमाणे दिसेल. हे मिश्रण तीन दिवसांपर्यंत टाचेला पडलेल्या भेगांवर लावून मसाज करा. तुम्हाला फरक जाणवेल. पायांच्या टाचा मुलायम होतील.

ऑलिव ऑईल : फक्त नारळाचे तेलच नाही, तर ऑलिव ऑईल पण टाचांना मुलायम बनवते. हातावर थोडेसे तेल घेऊन त्यांनी टाचांना मालीश करा. नंतर, अर्ध्या तासासाठी पाय उघडे ठेवा. असे आठवड्यातून एकदा केल्याने काही दिवसातच तुमच्या टाचा कोमल आणि मऊ होतील.

वैसलीन : ओठ फाटण्यापासून वाचवणारे वैसलीन टाचांसाठीसुद्धहा अत्यंत उपयोगी आहे. प्रथम बादलित पाणी गरम करून त्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. नंतर, पाय बाहेर काढून टॉवेलने पुसून घ्या आणि टाचांवर वैसलीन लावा आणि मोजे घालून झोपा. सकाळी उठल्यावर पाय स्वछ धुवा. काही दिवसानी या उपायाने तुमचे भेगा पडलेल्या टाचा कोमल होतील. ग्लिसरीन : ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून त्याचे मिश्रण टाचांवर लावा. नंतर कोमट पाण्याने पाय धुवा. तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल. जोजोबा ऑयल : जोजोबा ऑयल मध्ये ओट्स मिसळून लावल्याने टाचा कोमल होतात.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published.