वास्तू शास्त्रानुसार घरात का लावला पाहिजे धावत्या घोड्यांचा फोटो ?

आपले नशीब फळफळावे म्हणून लोक काय काय करत नाहीत ? नशीब उघडावे म्हणून लोक वास्तृशास्त्र फॉलो करतात. पण बरेचदा असे होते कि मनापासून मेहनत करूनही हवी तशी फळे मिळत नाहीत. त्याची करणे अनेक असतात पण लोक आपल्या नशीबाला दोष देऊ लागतात.

आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रातील एक असा महत्वाचा उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुमची आर्थिक भरभराट होईल. घरात किंवा कामाच्या ठिकाणी धावणाऱ्या घोड्यांचे चित्र लावण्यासंदर्भात बोलणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे त्यामागचे तथ्य.

धावणारे घोडे म्हणजे सकारात्मक उर्जेचा मोठा स्त्रोत मानले जाते म्हणून असे चित्र लावल्याने भरपूर उर्जा व सकारात्मकता निर्माण होईल. असे चित्र म्हणजे यश आणि प्रगतीचे प्रतिक आहे असे मानले जाते. म्हणून असे चित्र लावल्याने तुमची नक्कीच उत्तरोत्तर प्रगती होईल. माणसाने प्रगती करण्यासाठी सकारात्मक उर्जा असणे आवश्यक आहे असे चित्र नकारात्मक उर्जा नाहीशी करते.

कोणत्या प्रकारचे चित्र लावायचे : कोणत्या प्रकारचे चित्र लावायचे हे समजून घेणे महत्वाचे आहे. वास्तुशास्त्रात ७ या आकड्याला खूप महत्व आहे जसे कि सात फेरे, सप्तरंग इत्यादी. म्हणून सात धावत्या घोड्यांचे चित्र तुम्ही तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी लावलेत तर नक्की फायदा होईल. हे चित्र लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे कि ह्या घोड्यांचे तोंड बाहेरून आत येण्याच्या स्थितीत असायला हवे., जर हे चित्र दक्षिण दिशेला लावले तर अधिक चांगले.

त्याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे कि चित्रातील घोडे हे पांढर्या रंगाचे असावेत आणि त्यांचे तोंड हे एकाच दिशेत असायला हवे. पांढरा रंग हा शुभ आहे. हे चित्र खरेदी करताना हे लक्षात असू द्या कि दुर्मुखलेल्या घोड्यांचे चित्र कधीही घेऊ नका, प्रसन्न चेहरा असलेल्या घोड्यांचे चित्र घरात सकारात्मक उर्जा निर्माण करेल.

 सात अंक खूप शुभ असतो. ऋषी सात, इंद्रधनुष्याचे रंग सात, सप्तपदी देखील सात. असे अनेक गोष्टी 7 अंकाचे गुपित सांगतात. म्हणून 7 घोड्यांची तसबीरच लावावी. घोड्याची तसबीर बहुतेक वेळेस व्यावसायिक संस्थानामध्ये आणि कार्यालयामध्ये लावतात.

म्हणून घरामध्ये घोड्याचे तसबीर लावण्याचा आधी वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल. ते आपणांस योग्य फोटो तसेच योग्य जागा याबद्दल सल्ला देऊ शकतात. कारण घराची बनावट बघून योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. घोड्यांची तसबीर लावायची नसल्यास आपण तरंगणाऱ्या माश्यांचे चित्र देखील लावू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.