मोहरीचे तेल तर साधारण सर्व घरात वापरले जाते. कोणी जेवण बनवण्यासाठी तर कोणी शरीराला मालीश करण्यासाठी मोहरीचे तेल रोज वापरतात. मोहरीचे तेल हे तब्येतीसाठी खूपच उत्तम आहे. या तेलात कितीतरी विटमिन्स, मिनेरल्स, आणि इतर पोषक तत्वे आहेत, जी शरीराला अत्यंत फायदेशीर आहेत. जर झोपायच्या आधी हे तेल डोक्याला लावले तर, गजब फायदे मिळू शकतात. आज आम्ही तुम्हाला त्या भागांबद्दल सांगणार आहोत, जिथे मोहरीचे तेल लावल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो.
रोज रात्री झोपायच्या थोडे आधी जर आपण मोहरीचे तेल अंगाला लावून मालीश केलीत, तर तुमच्या डोळ्यांची दृष्टी उत्तम होते. त्याशिवाय झोप पण चांगली येते. असे केल्यामुळे पुरूषांचे शरीर स्वस्थ आणि मजबूत होते.
मोहरीचे तेल कोरफडीच्या जेल मध्ये मिसळून डोक्याला ३ ते ५ मिनिटे मसाज करावा आणि नंतर केसांना लावावे. खासकरून केसांच्या टोकांना लावा. केसांची वेणी घाला आणि १ तास तशीच ठेवा. १ तासानंतर केस धुवा. हे केसांना कंडिशन करण्याबरोबर केसांचा दाटपणा आणि काळेपणा वाढवते.
झोपण्याच्या आधी मोहरीच्या तेलाने मसाज करून पण झोपता येईल. मोहरीचे तेल शरीराची रोम छिद्रे मोकळी करून स्नायूंना आराम देते. आपल्याला त्यामुळे आरामदायी वाटते. मोहरी तेलातील ओलिक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिड हे केसांच्या वाढीसाठी उपयोगी आहे. यांचा सतत जर वापर केला, तर केस गळायचे थांबतात. हे जेल केसांना पांढरे होण्यापासून पण वाचवते.
आपले शरीर जर दुखत असेल, तर आपल्याला आराम वाटतो. शरीराच्या मसाजासाठी मोहरीच्या तेलाचा प्रयोग हिवाळ्यात खूपच उत्तम मानला जातो. मोहरीचे तेल शरीरात ऊर्जा उत्पन्न करते. नवजात शिशूला किंवा बाळाला मोहरीच्या तेलाने मसाज केल्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात. काही लोक तर हे तेल औषध म्हणून वापरतात.
असे तर, मोहरीचे तेल खूप पौष्टिक मानले जाते. म्हणूनच, हे जेवण बनवण्यासाठी वापरतात. हे प्रकृतीने गरम असल्यामुळे या तेलाचा थंडीच्या दिवसात खूपच उपयोग होतो. हे आपल्या शरीरातील मासपेशीना मजबूत बनवते व रक्ताभिसरणाची क्रिया उत्तम करण्यास मदत करते. शरीरात ऊर्जा उत्पन्न करण्याचे काम मोहरीचे तेल करते.
भूक जर लागत नसेल, तर मोहरीचे तेल खूपच फायदेशीर आहे. जर भूक लागत नसेल, तर जेवण तयार करताना मोहरीचे तेल वापरा, तुमची भूक हळू हळू वाढू लागेल. तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मोहरीचे तेल खूप उपयोगी आहे. मोहरीचे तेल वापरल्यामुळे कोरोनरी हार्ट या आजाराचा धोका कमी होतो. म्हणूनच, हे बहुगुणी तेल लवकर वापरायला सुरुवात करा.
जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद…