आठवड्यातून २ वेळा मासे खाल्यामुळे होते या ३ भयंकर आजारांपासून सुटका….

कोणत्याही प्रकारचे मासे ते गोड्या पाण्यातील असतील किंवा खर्‍या पाण्यातील असतील, दोघांचे स्वत:चे असे खास गुणधर्म असतात, जे आपल्या उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. माशांच्या सेवनामुळे होणारे फायदे दीर्घकाळपर्यन्त आपली तब्येत उत्तम ठेवण्यास मदत करतात.

तसे बघितले तर, मासे हे बंगाली लोकांच्या जेवणातील एक खास पदार्थ आहे. बंगाली समाजाचे लोक बुद्धिमान असतात, कारण ते माशांचे भरपूर सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला आणि बुद्धीला योग्य पोषण मिळते. माशांमध्ये असलेली पोषक तत्वे आपला शारीरिक आणि मानसिक विकास करतात.

माशांमध्ये असलेली पोषक तत्वे, आपल्या रोजच्या जेवणातील प्रथिनांची कमी भरून काढतात, कारण यामध्ये मिनरल्स, प्रथिने आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. अनेक प्रकारच्या माशांचा उपयोग विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. काही समुद्री मासे, जसे बांगडा, सुरमई, आणि पेडवे यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फैटी एसिड मुबलक प्रमाणात आढळून येते. हे बुद्धीच्या विकासासाठी खूपच जरूरी आहे. हेच कारण आहे, की मुलांना आणि गर्भवती महिलांना दिल्या जाणार्‍या आहारात माशांचा प्रामुख्याने समावेश केलेला असतो.

आज आम्ही तुम्हाला मासे सेवन केल्यामुळे काय फायदे होतात ते सांगणार आहोत. असे तर, तुम्ही सगळेच जाणता, की माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनांची मात्रा असते आणि माशांमध्ये आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊया, आणखी काही फायदे तुमच्या माहितीसाठी:

हृदयरोगांमध्ये: ज्यांना हृदयासंबंधित काही आजार आहेत, त्यांनी माशांचे सेवन केले पाहिजे, कारण माशांमध्ये ओमेगा ३ फैटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे हृदयात होणार्‍या रक्ताच्या गुठळ्यांना नष्ट करतात आणि हार्ट अॅटक सारख्या समस्येपासून आपल्याला वाचवते. टी. बी सारखा आजार: ज्या लोकांना टी बी हा आजार असतो, त्यांनी रोज एका पूर्ण माश्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन केले पाहिजे. जर त्यांनी रोज एक तयार माशाचे सेवन केले, तर त्यांचा टीबी हा आजार लवकर बरा होऊ शकतो.

प्रोटेन्सची कमतरता: ज्या लोकांच्या शरीरात प्रथिनांची कमतरता असते, त्यांनी माशाचे सेवन जरूर केले पाहिजे. कारण माशांमध्ये बाकी सर्व पदार्थांपेक्षा प्रथिने अधिक प्रमाणात असतात.

तेजस्वी दृष्टीसाठी: ज्या लोकांचे डोळे दुर्बल असतात किंवा कमजोर असतात, जे लोक संगणक आणि मोबाइलवर जास्त वेळ काम करतात, त्या व्यक्तींचे डोळे कमजोर होत जातात, तर अशा लोकांनी आठवड्यातून दोनदा माशाचे सेवन केले पाहिजे.

परंतु, काही माशांमध्ये पार्‍याचे प्रमाण अधिक असते, असे मासे खाणे शरीरास अपायकारक आहे, हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे. त्याप्रमाणे माशांची खाण्यासाठी योग्य निवड केली पाहिजे. जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published.