या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही – आर्य चाणक्य

घरात पैसे टिकत नसतील –तर चाणक्यांनी सांगितलेली नीतीमूल्ये तुमच्या उपयोगी पडतील – काय आहेत ही मूल्ये पाहूया. चाणक्य नीतीनुसार धन किंवा पैशाचा जर संचय करायचा असेल, तर सगळ्यात उत्तम पद्धत आहे की अनावश्यक खर्च न करणे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीग्रंथात अशी बरीच नीतीमूल्ये सांगितली आहेत, ज्याच्या आचरणाने कोणत्याही व्यक्तिला जीवनात येणार्‍या अडचणींवर पर्याय मिळू शकेल.

पैशाच्या बाबतीत सुद्धहा आचार्य चाणक्यांनी आपल्या पुस्तकात कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या मतानुसार, प्रत्येक व्यक्तिला आपल्या भविष्य काळात येणार्‍या वाईट दिवसांचा आधीच विचार करून पैशाची बचत आधीच करून ठेवली पाहिजे. चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीने अशा ठिकाणी राहू नये, जिथे त्याच्यासाठी रोजगार, काम, शिक्षण, शुभचिंतक आणि आदर व सन्मानाची कमी असेल.

चाणक्य म्हणतात, कधीही पैशाचा किंवा धनाचा मोह ठेवू नये, ज्यामुळे आपल्याला आपला धर्म सोडावा लागेल, आणि शत्रूची खुशामत करावी लागेल. चला तर मग जाणून घेऊया, जर तुम्ही पैशाची बचत करू शकत नसाल तर, चाणक्य नीतिनुसार तुम्हाला काय शिकले पाहिजे, काय आत्मसात केले पाहिजे, स्वत:मध्ये कोणते बदल केले पाहिजेत:

अनावश्यक धन खर्च करू नका: चाणक्य नीतिनुसार धन साठवण्याची सगळ्यात उपयोगी पद्धत आहे, की अनावश्यक खर्च न करणे. त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तिला पैशाच्या बाबतीत खूपच सतर्क राहायला पाहिजे व पैसा हा फक्त एक जीवन जगण्यासाठी “साधन” आहे त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजेच, फक्त जीवनासाठी जरूरी म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे. साधन हे व्यक्तिला उत्तम बनवते, म्हणूनच त्याचा उपयोग विचारपूर्वक करावा. जिथे जरूर नाही, तिथे उगाच धन खर्च करू नये. जेव्हा जरूर असेल, तेव्हाच त्याचा उपयोग करावा.

धनसंचयाबरोबर गुंतवणूक पण जरूरी: चाणक्य नीतिनुसार धनाचा योग्य प्रकारे उपयोग पण करता आला पाहिजे. बचत करण्याबरोबर धनाची गुंतवणूक पण तितकीच जरूरी आहे. त्याचा योग्य कामासाठी उपयोग व योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे जरूरी आहे व शक्य असेल तर गरजुना मदत करावयास विसरू नये. चाणक्य नीतिनुसार, ज्याप्रमाणे हंड्यात भरलेले पाणी जर उपयोगात आणले नाही, तर खराब होते, त्याचप्रमाणे, धनाचा योग्य उपयोग केला गेला नाही, तर त्याची काही किंमत राहात नाही. तसेच, धन कमावण्यासाठी माणसाकडे काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी ध्येय असले पाहिजे. कोणतेही लक्ष जर डोळ्यासमोर नसेल, तर सफलता मिळवणे कठीण आहे.

अनावश्यक चैनी करु नये: आचार्य चाणक्य यांच्या नीतीमूल्याप्रमाणे व्यक्तिने धन प्राप्तीसाठी लोभ करु नये. धन आणि दौलतीने जीवनात समतोल साधता येतो, म्हणूनच, आपल्यासाठी एवढेच धन आवश्यक आहे, जे आपल्या प्रार्थमिक गरजा भागवू शकेल. चैनीसाठी पैसा खर्च करण्यापासून स्वत:ला वंचित ठेवले पाहिजे. व्यक्तिला आपल्या मूलभूत गरजांसाठीच धन खर्च केले पाहिजे. व्यक्तीने आपल्या श्रीमंतीचे अनावश्यक प्रदर्शन करू नये. धनाचे प्रदर्शन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला तिच्या कृपेपासून वंचित ठेवते.

पैशाचे अयोग्य नियोजन… प्रत्येक महिन्याला पैसा तर मिळतो, ठराविक रक्कम हातात तर येते मात्र त्याचे व्यवस्थापन, त्या पैशाचे योग्य नियोजन, कसे करायचे याची जाणीव 90 टक्के लोकांना नसते. पैसा मिळवायचा कसा याचे नियोजन मात्र अनेक लोक करतात, व त्यांचा प्लॅन हि ते सांगू शकतात पण मिळलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन हे देखील महत्वाची गोष्ट आहे. पैसा मिळवणे या जगात एवढी अवघड गोष्ट नाही पण पैशाचे योग्य नियोजन व योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *