नाक बंद असुदे किंवा नाक गळत असुदे, ‘या’ सोप्प्या घरगुती उपायांनी पळवून लावा सर्दीला…

सर्दी आणि खोकला, तसेच नाक गळणे ही सामान्य समस्या आहे. एकदा जर सर्दी खोकला झाला, की तो सहजपणे बरा होत नाही आणि कितीतरी दिवस आपल्याला त्रास देत राहातो. आज आम्ही घेऊन आलो आहोत, केवळ तुमच्यासाठी, सर्दी-खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत .

हळद ही बदलत्या ऋतुनुसार होणार्‍या सर्दीवर खूपच फायदेशीर आहे. नाकातून सारखे पाणी येत असेल, म्हणजेच नाक गळत असेल, तर ते बरे करण्यासाठी, हळद जाळून त्याचा धूर करावा व तो नाकात घ्यावा, त्यामुळे नाकातून पाणी वेगात येऊ लागेल, पण त्वरित आराम मिळेल.

जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद असेल तर दालचिनी, मिरपूड, वेलची आणि जिरे यांचे दाणे समान प्रमाणात घेऊन एका सूती कपड्यात बांधा आणि त्याचा वास घ्या, त्यामुळे शिंका येतील, पण हळूहळू बंद नाक मोकळे होईल. सर्दी झाल्यावर दहा ग्रॅम गव्हाचा कोंडा, पाच लवंगा, थोडे मीठ घेऊन ते सर्व पाण्यात मिसळा आणि उकळून त्याचा काढा तयार करा. एक कप काढा घेतल्याने खूपच फायदा होईल.

या ऋतुमध्ये तुळस आणि आले फायदेशीर आहे. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत, जे सर्दी आणि फ्लू पासून आपला बचाव करण्यासाठी प्रभावी आहेत. तुळशीची पाने चावून खाल्यामुळे थंडी वाजणे आणि फ्लूसारखा ताप येणे दूर राहते . त्याचप्रमाणे तुळस व बेलाची पाने (प्रत्येकी ५ ग्रॅम) बारीक करून पाण्यात मिसळा आणि काढा तयार करा. यामुळे खोकला आणि दम्याचा त्रास बरा होतो.

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्यामुळे किंवा चहामध्ये आल्याबरोबर तुळशीचा वापर केल्याने सर्दीपासून ती आपला बचाव करतात, तसेच रोगप्रतिकार शक्ती पण वाढवतात. आल्यामध्ये आपल्याला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्याची प्रचंड शक्ती असते. आल्याबरोबर तुळशीचे सेवन केल्याने सर्व प्रकारच्या खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यात तुळशीच्या ५ ते ६ पाने लवंगा, वेलची, मध या सर्वांचा पाण्यात उकळवून काढा करा व तो नियमितपणे घ्या. असे केल्याने तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल

बहुतेक लोकांना आले घालून केलेला चहा आवडतो. सर्दी आणि खोकल्याच्या बाबतीत, चहामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी मिसळून तो चहा जर प्यायला तर तुमच्या शरीरास खूप आराम मिळतो. तसेच रात्री हळद घालून गरम दूध प्यायल्यामुळे नाक तर मोकळे होतेच, शिवाय घसा दुखत असेल तर तो दुखायचा थांबतो.

बदलत्या ऋतुमुळे, बहुतेक लोकांच्या खोकला आणि सर्दीसारख्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. परंतु, तज्ञाच्या मते, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे, नाक गळणे, हे सर्व विषाणू आणि विषाणूजन्य संक्रमणामुळे होते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा .

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.