सारा अली खान सारखी सारखी गोव्याला का जाते, उघडले मोठे रहस्य…

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही सध्या खूपच चर्चेत आहे. त्याचे कारण तिचा आगामी येणारा चित्रपट नसून तिची जुनी मैत्रीण रिया चक्रवर्ती आहे. हे खरे आहे की, सुशांतसिंग राजपूत यांच्या कथित आ त्म ह त्या प्रकरणी ड्र ग्स (नशिले पदार्थ) अँगल उघडकीस आल्यानंतर रियाला अटक करण्यात आली होती आणि चौकशी दरम्यान तिने २५ बॉलीवूड सेलिब्रिटींची नावे दिली, जे या ड्र ग च्या विळख्यात सहभागी आहेत.

या २५नावांपैकी सर्वात धक्कादायक नाव आहे ते म्हणजे सारा अली खान. त्यानंतर सारा सतत चर्चेत राहिली आहे. यानंतर,रिया आणि साराची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाली होती. त्या फोटोंच्या जोरावर असे म्हटले जात आहे की,या दोघींची खूप उत्तम अशी मैत्री होती.

वास्तविक रिया चक्रवर्ती यांनी एनसीबीला कबूल केले की सारा आणि ती एकत्र ड्र ग्ज घेत असत. दरम्यान, अशी बातमी येते आहे की सारा अली खान आजकाल आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर गोव्यात आहे आणि सुट्टीचा आनंद घेत आहे. दुसरीकडे, अशी बातमी येते आहे की एनसीबी सारा अली खान यांना शक्य तितक्या लवकर चौकशीसाठी बोलवू शकते. तथापि, सध्या साराकडे कोणतेही काम नाही, म्हणून ती गोव्यात आपल्या मित्रा मैत्रिणींबरोबर मजा करीत आहे. तुमच्या माहितीसाठी,ऑक्टोबर महिन्यापासून सारा तिच्या आगामी “अतरंगी रे” चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करेल.

तसे बघितले तर,सारा अली खान हिची गोव्यात मोकळा वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे साराला पुन्हा पुन्हा गोव्याला जायला का आवडते, याविषयी प्रश्नउपस्थित केले जात आहेत. काय,यामागील कारण ड्र ग्स हे तर नाही? पण तिचे म्हणणे आहे, की गोवा हे तिचे सगळ्यात आवडते ठिकाण आहे, तेथील वातावरण, हवामान आणि सुंदर रमणीय असे सृष्टी सौंदर्य तिला खूप आवडते.

दुसरीकडे, रिया चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सारा खूप वेळा गोव्याला गेली होती. पण, सत्य तेव्हाच उघड होईल, जेव्हा एनसीबी साराची चौकशी करेल. तथापि, गेल्या १ आठवड्यापासून सारा गोव्यात आहे. तिने स्वत: तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या काही महिन्यांत साराचे जेवढे काही फोटोशूट झाले, ते सर्व गोव्यात झाले आहेत. अशा परिस्थितीत नक्कीच प्रश्न पडतो की साराला गोवा इतके का आवडते?सारा बर्‍याचदा फक्त मित्रांसोबतच नाही,तर आपल्या कुटुंबासमवेतपण गोव्यात जात असते. तिने अनेक फॅमिली फोटोही आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

जाणून घेऊया कधी रिलीज होईल कुली नंबर १ : तुमच्या माहितीसाठी,सारा तिच्या आगामी ‘कुली नं.१’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यालाही गेली होती, गोव्यात चित्रपटाच्या काही खास सीनचे चित्रीकरण केले जाणार होते. यासंदर्भात “कुली नंबर १” ची टीम गोव्यात दाखल झाली. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर,त्यांचा आगामी ‘कुली नंबर १’ हा चित्रपट बनवून सज्ज आहे, पण लॉकडाऊनमुळे तो अद्याप प्रदर्शित झाला नाही.

या चित्रपटात सारासोबत वरुण धवन दिसणार आहे. असे सांगण्यात येत आहे, की हा चित्रपट नवीन वर्षात प्रदर्शित होणारआहे. आगामी काळात सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासमवेत “अतरंगी रे” चित्रपटाची शूटिंग करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *