फक्त अंगठ्यापेक्षा पायाचे बोट मोठे असणाऱ्या लोकांमध्येच असतात “हे” गुण तुमच्यामध्ये आहेत का हे गुण नक्की पहा…

समुद्रशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाच एक अविभाज्य घटक आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की समुद्रशास्त्रानुसार आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी निष्कर्ष काढू शकतो. ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीवरून त्याचा स्वभाव आणि त्याच्या भविष्याविषयी जाणून घेऊ शकतो, तसेच, आपण एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या बोटांवरून त्याच्या स्वभावाचा अंदाज घेऊ शकतो. चला तर मग बघूया काय सांगते भविष्य:

ज्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा लांब असतो आणि बाकीची बोटं छोटी असतात पण लांबीत सारखीच असतात, या लोकांबद्दल असे म्हणतात की हे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. या लोकांना कोणतीही कामे संयमाने करायला आवडतात. हे लोक कोणताही वादविवाद शांतपणे न बोलता मिटविणे पसंत करतात. परंतु, ही माणसे थोडीशी आळशी असतात. हे लोक प्रेमाच्या बाबतीत मात्र खूप गंभीर व पक्के असतात, जेणेकरून त्यांच्या प्रेमसंबंधात कधीही दुरावा येत नाही. ते दुरावा येऊच देत नाहीत.

ज्योतिषशास्त्रानुसार शरीराचे अवयव आणि त्याची लक्षणे पाहून त्या व्यक्तिमत्वाबद्दल भविष्य सांगणे ह्या पद्धतीला “समुद्रशास्त्र” असे म्हणतात. हा ज्योतिष शास्त्राचा एक अविभाज्य घटक आहे आणि या शास्त्राचा इतिहास हि खूप प्राचीन आहे. समुद्रशास्त्रानुसार, माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवासाठी विशेष वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत.

आपल्या शरीराच्या अवयवांची रचना, आकार आणि रंग यावरून व्यक्तिमत्वाची रहस्ये समजतात आणि त्यावरून त्यांच्या भविष्याबद्दल माहिती देखील मिळते. एखाद्या व्यक्तीच्या पायाचा आकार पाहून सहजपणे सांगितले जाऊ शकते की तो पुरुष किंवा ती स्त्री वागणुक, संस्कार, आणि कार्यक्षेत्र याबाबतीत कशी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या पायांची ठेवण भिन्न असते. येथे आम्ही पायांचे वर्णन करीत आहोत. आपल्या पायाचा आकार या आकारांसह जुळवून आपण आपल्या स्वभावाची वैशिष्ठ्ये जाणून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण दुसर्‍यांच्या पायांचे आकार पाहून त्यांच्याबद्दल पण बर्‍याच गोष्टी जाणून घेऊ शकता.

ज्या लोकांच्या पायाचे अंगठ्याजवळील बोट मोठे असते, त्यानंतरचे दुसरे बोट थोडेसे लहान आणि उरलेली बोटे त्यापेक्षा लहान असतील, तर ती व्यक्ति खूपच उत्साही असते. तसे बघितले तर असे लोक खूपच उतावीळ किंवा कामाच्या बाबतीत वेडे असतात. हे कोणतेही काम पूर्ण उत्साहाने आणि जोशाने पूर्ण करतात. उतावीळ व उत्साही असल्याकारणाने त्यांना मौज मजा करणे खूपच पसंत असते. हे लोक जीवनाचा पूर्ण आनंद घेतात. नेहमीच ताजेतवाने व प्रसन्न असतात व दुसर्‍यांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.

ज्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असते, व बाकी उरलेली बोटे लहान असतात, असे लोक कोणतेही काम एकाच पद्धतीने पूर्ण करणे पसंत करतात. काम करण्याच्या बाबतीत त्यांच्या योजना वेगळ्या प्रकारच्या पण उत्तम असतात. त्यांच्या ज्या कामाच्या योजना असतात, त्यामुळे त्यांना विशिष्ट असे समाजात स्थान प्राप्त होते. घर परिवारात सुद्धा त्यांना विशेष सुखसोयी प्राप्त होतात.

ज्या लोकांच्या पायाची बोटे अंगठ्याच्या घटत्या क्रमाने असतात, असे लोक इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींच्या पायाचा आकार त्यांना दुसर्‍यांवर अधिकार गाजवणारा बनवतो. या प्रकारच्या पाय असलेल्या व्यक्तींची अशी इच्छा असते, की त्यांना सर्वत्र पूर्ण आदर मिळाला पाहिजे आणि सर्वांनी त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. जर घरात किंवा कुटुंबातील किंवा समाजातील एखादी व्यक्ती त्यांच्या इच्छेनुसार वागली नाही तर मात्र त्यांना त्या व्यक्तीचा खूप राग येतो. जर अशा प्रकारचे एखाद्या व्यक्तीचे पाय असतील तर ती व्यक्ती आपल्या जोडीदारावर आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार गाजवते.

ज्या लोकांच्या पायाचा अंगठा आणि त्याच्या जवळची दोन बोटे समान असतात, आणि उर्वरित बोटे लहान असतात, तर अशा व्यक्ती कठोर परिश्रम करणार्‍या असतात. असे लोक त्यांच्या श्रमांच्या जोरावर कामांमध्ये यश मिळवतात. त्यांच्या श्रमांच्या बळावर त्यांना आदर सन्मान देखील मिळतो. असे पाय असलेल्या व्यक्ति इतरांच्या कामाचे कौतुक देखील करतात आणि त्यांना सतत काम करणारी लोक जास्त आवडतात.

अशा आकाराचे पाय असणार्‍या व्यक्ति आपल्या कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतात. ते श्रमांच्या जोरावरच बरेच यश मिळवतात. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.