लसणाच्या मदतीने मिळवा तुमची गमावलेली ताकद पुरुषांनी जरूर केले पाहिजे लसूणाचे सेवन…

लसूण सेवन हे भारतात गेली अनेक वर्षे होत आहे व प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात तुम्हाला लसूण नक्की मिळेल, कारण ही गुणकारी तर असतेच, त्याचबरोबर ही आपल्या जेवणाचा स्वाद वाढवते. पाण्यासोबत कच्चा लसूण सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यानं विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

शरीर डिटॉक्स करण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मधूमेह, कॅन्सर, डिप्रेशन यांसारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. एक ते दोन आठवडे लसूणाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील संतुलित राहते.

याव्यतिरिक्त लसूणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दातदुखीचा त्रास असेल तर लसूणाचे सेवन फायदेशीर ठरते. तुमच्या दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसूणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा. दात दुखणे थांबते. रोज रात्री एक कच्या लसूणाची पाकळी खाल्यामुळे होणारे हे ५ महत्वाचे फायदे जाणून घेऊया:

लसणात असलेल्या प्रोटिन्समुळे शरीर ताजेतवाने होते व लसूणीतील कार्बोहायड्रेटस मुळे शरीरातील कमजोरी कमी होते. शरीराला ताकद मिळते. तसेच, लसणात योग्य प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडांना मजबूती मिळते. यात असलेल्या एलिसिन मुळे चरबी बर्न होण्याची क्रिया खूपच वेगात होते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित किंवा प्रमाणात राहाण्यास मदत होते.

लसणात असलेले फायबर्स बद्धकोष्टता आणि पोटदुखी ह्या दोन्ही समस्या दूर करतात. त्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होते. शरीराला ताकद मिळते. योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळाल्यामुळे आपली हाडे मजबूत राहायला मदत होते. लसणाचे सेवन शरीरात ऊर्जा उत्पन्न करते व थंडी पासून आपले रक्षण करते. त्याचबरोबर, लसूण आपल्याला कॅन्सर पासून वाचविते. मुख्यत: आतडयाच्या आणि स्तनाच्या कॅन्सरपासून संरक्षण करणारी मानली जाते.

लसूण पचनसंस्था सुरळीत करते व भूक वाढवते. जेव्हा पण तुम्हाला घाबरल्यासारखे वाटते, त्यावेळेस तुमच्या पोटात अॅसिड तयार होत जाते, पण ते अॅसिड तयार होण्याची क्रिया लसूण होऊ देत नाही. ही तणावापासून आपल्याला दूर ठेवायला मदत करते. लसूण ही पायाच्या आणि कानाच्या जंतु संसर्गासारख्या रोगात उपयोगी आहे. यावर कच्या लसणाचा रस घेतला जातो. खाज येत असेल, तर ज्या भागाला खाज येत असेल, त्या भागावर लसणाचा रस लावावा.

जे लोक सकाळी लसूण खातात. त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं. गंभीर आजारांपासून बचाव होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.