सतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे जाणून घ्या घरगुती रामबाण उपाय…

सारख्या ढेकर येत असल्यास अस्वस्थ वाटू शकते, काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होईल. जेव्हा तुम्ही अनेक लोकांमध्ये असता आणि अचानक तुम्हाला शिंक अथवा ढेकर असल्यास खूप ऑक्‍वर्ड वाटत राहाते. काही लोकांना नेहमीच असे होते. विशेषतः काहीलोकांना थोड्या थोड्या वेळाने ढेकरा येत राहातात. याची अनेक कारणे आहेत. पोट बिघडलेले असणे आणि गैस ही ह्याची महत्वाची कारणे आहेत. काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून मुक्ती मिळवू शकता. या सगळ्या गोष्टी सहजपणे तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात ज्या तुम्हाला या समस्येपासून सुटका करण्यात मदत करतील.

आले : याचे अनेक फायदे असतात. हे एंटीऑक्सीडेंट आणि एंटीबायोटिकचे भांडार असते. याची चव तर छान असतेच परंतु हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते. हे पचनाच्या तक्रारी व गैस यांच्यावर फारच गुणकारी आहे. तुम्ही एक कप गरम पाण्यात एक आल्याचा तुकडा घालून दहा मिनिटे तसेच ठेवून द्या. यात थोडा मध घालून २ ते तीन वेळा याचे सेवन करा. याने ढेकरीची समस्या दूर होते.

पुदीना : पुन्हा पुन्हा ढेकर येण्याची समस्या पुदिन्यामुळे दूर होते. अनेक प्रकारे तुम्ही पुदिन्याचा समावेश स्वयंपाकात करू शकता. सरबत, चटणी किंवा दह्यात घालून पुदिन्याचे सेवन केले जाऊ शकते. रोज एक कप गरम पाण्यात पुदिन्याची काही पाने घाला आणि दहा मिनिटांनी ते पाणी प्या, याने तुम्हाला आराम वाटेल.

वेलची : पुन्हा पुन्हा ढेकर येण्याचे कारण पोटातील गैस हे असते. जर तुम्हाला सारख्या ढेकरा येत असतील तर तुम्हाला आधी तुमच्या पोटाचा इलाज करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या आहारात वेलचीचा समावेश करायला हवा. वेलची खाऊन पोटाच्या समस्या दूर होतात ज्याने ढेकरा बंद होतात. दिवसातून एकदा वेलची चावून खावी. याने पचनक्रियाही सुधारते आणि तुमच्या ढेकरीची समस्याही दूर होईल.

कैमोमाइल टी ; कैमोमाइल टी ढेकर समस्येवर खूप गुणकारी आहे. गरम पाण्यात कैमोमाइल टी बैग घालून पाच दहा मिनिटे ठेवून ते पाणी प्यावे. गुळ ; जर जर तुम्हाला करपट ढेकर येत असेल तर गुळ खाल्ला पाहिजे. गुळाचा एक खडा तोंडात घेऊन तो चघळला तर खूप फायदा होईल. लसूण ; लसणीची एक कळी कच्ची चावून खावी व त्यावर एक ग्लास पाणी प्यावेयाने तुमची पचन यंत्रणा सुधारेल.

का येतात सारख्या ढेकरा :तुमच्या खाण्याच्या सवयी या ढेकर येण्यास जबाबदार असतात. कोल्ड्रिंक किंवा जंक फूड खाल्ल्याने असे होऊ शकते. यातल्या गोष्टी टाळा जास्तकरून रात्रीच्या वेळी. तुमचिया पचनसंस्था नीट असेल तर तुम्हाला सारख्या सारख्या ढेकरा येणे बंद होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.