या चार गोष्टीमध्ये समाधानी होत नाही माणूस त्यामुळेच भोगावे लागतात वाईट परिणाम…

चाणक्य नीति जगाच्या सगळ्यात प्रमाणित नितींपैकी एक आहे. विशेषतः भारतात अनेक लोक या नीतीच्या आधारावर चालतात. असे मानतात कि या नीतीप्रमाणे चालणारे लोक सदा सुखी राहातात आणि दुःख दारिद्रय इत्यादी यांच्या वाट्यालाही जात नाही’. जर तुम्हीही ह्या नीतीला अनुसरून वागलात तर तुम्ही कायम सुखी राहाल आणि यश तुमच्या पायाशी असेल. आज आम्ही तुम्हाला नीतिशास्त्राच्या अशाच एका श्लोकाची ओळख करून देणार आहोत. तो वाचून तुम्ही जर तुमच्या जीवनात त्याचा अवलंब केलात तर तुमचे आयुष्य सुखी आणि समाधानी होईल. तर चला पाहूया काय आहे हा श्लोक –

मनुष्य प्रत्येक काम सुखप्राप्तीसाठीच करत असतो. याच ठिकाणी माणूस सुखाच्या त्या साधनांच्या मागे पळत असतो ज्यामुळे आयुष्य सुखकर आणि सोपे बनेल. या साधनात धन दौलत, ऐश्वर्य, मान सन्मान , शारीरिक तसेच मानसिक सुख यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे. परंतु यांत काही गोष्टी अशा आहेत ज्यांमुळे मनुष्य कधीही संतुष्ट होत नाही. त्याच्याशी संबंधित चाणक्याने त्याच्या नीतीशास्त्रात एक श्लोक दिला आहे. त्या श्लोकात त्या चार गोष्टींचा समावेश आहे ज्यांच्यासाठी मनुष्य नेहमीच लालची असतो.

धनेषु जीवितव्येषु स्त्रीषु भोजनवृत्तिषु। अतृप्ताः मानवाः सर्वे याता यास्यन्ति यान्ति च॥

धन : या श्लोकात चाणक्य सांगतात कि माणसाला धनासाठी कायमच लालच असते. कितीही कमावले तरी त्याची लालसा काही संपत नाही. आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत माणूस पैसा कमावण्याचे प्रयत्न करत राहातो. जास्तीत जास्त पैसे कुठून कसे मिळवता येतील याचा तो नेहमीच विचार करतो.असे लोक कधीही पैशांनी संतुष्ट होत नाहीत, अशा स्थितीत अनेक वेळा मनुष्य चुकीच्या मार्गालाही लागतो. असेही म्हंटले तरी चालेल कि पैशाची हाव माणसाचे आयुष्य उध्वस्त करते.

आयुष्य : या श्लोकात चाणक्याने जीवनाचा उल्लेखही केला आहे. चाणक्य सांगतात कि जो या पृथ्वीवर जन्म घेतो त्याला मरायची इच्छा होत नाही . कोणीही माणूस असो, गरीब किंवा श्रीमंत, आयुष्यापासून तो कधीही समाधानी नसतो. भोजन : या श्लोकात चाणक्य भोजनाचाही उल्लेख करतात. ते म्हणतात कि माणसाने किती भोजन केले तरी तो तृप्त होत नाही, त्याहून जास्त खाण्याची इच्छा ठेवतो. ते असेही सांगतात कि माणसाने फक्त आवश्यक तितकेच भोजन करायला हवे. जास्त भोजन केल्याने आजार होऊ शकतात.

स्त्री : या श्लोकाच्या शेवटी चाणक्य भोजनाच्या बरोबरीनेच स्त्रीचाही उल्लेख करतात. त्यांचे असे मानणे आहे कि या बाबतीतही अनेक पुरुष कायम असंतुष्टच असतात. यांमुळे माणूस उध्वस्त होतो. चाणक्याच्या मते, धन, आयुष्य, भोजन आणि स्त्री याबाबतीत माणसाने कधीही असंतुष्ट असू नाते अन्यथा आयुष्य बरबाद होईल/ ते असेही सांगतात कि या चार गोष्टींवर नियंत्रण मिळवणारा माणूसच सुखी होतो नाहीतर त्याचे जीवन नष्ट होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.