फक्त 5 मिनिटात झोप लागेल असा घरघुती उपाय…

झोप पूर्ण न झाल्यामुळे शाररिक आजार होतात, ज्यामध्ये महत्वाचा आजार म्हणजे जास्त प्रमाणात पित्त होते, डोकं जड होतं, दिवसभर आळस येतो, असे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. झोप न येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विचार व मानसिक तणाव.. जवढे टेंशन वाढत जाईल तेवढी झोप कमी होईल. परिणामी अनेक रोगांना आमंत्रण मिळेल, त्यासाठी झोपण्याच्या वेळेत शक्य तेवढे कमी विचार करणे खूप गरजेचे आहे.

निगेटिव्ह विचार झोपण्याच्या अगोदर मनात आले तर, झोप लवकर येत नाही व नकारात्मक विचार मनामध्ये भीती निर्माण करतात, एखादा प्रॉब्लेम होणार, हा विचार मनात आल्या कारणाने झोप येत नाही यासाठी झोपताना नकारात्मक विचार करू नका. झोप लागण्यासाठी काही उपाय करून पाहा..

सर्वात पहिला उपाय आहे; नकारात्मक विचार सोडा.. व काही सकारात्मक विचार करा, स्वतःचे पुढे काही चांगले दिवस येणार आहेत, असा विचार करा. आपल्या जॉबमध्ये चांगली बढती मिळणार आहे, पेमेंट वाढणार आहे, बिजनेस भरपूर मोठा होणार आहे, गाडी बांगला सर्व काही स्वप्ने आपली पूर्ण होणार आहेत. आपल्याला जे काही हवे ते सर्व आपल्या जवळ आहे, आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख नाही, असा विचार करा आणि झोपी जा सकारात्मक विचार सरणीमुळे झोप चांगली लागते व मन ही शांत राहते..

दुसरा उपाय आहे ; मोबाईल किंवा टीव्ही.. झोपण्याच्या वेळेत बंद ठेवा किंवा आपल्या पासून दूर ठेवा. ज्यामुळे लक्ष विचलित होणार नाही, बऱ्याच व्यक्तींना झोपताना मोबाईलवर चाटींग करायची किंवा टीव्ही पहायची सवय असते. ज्यामुळे पुढे काय होईल याची उत्सुकता वाढत राहते समजा आपण चाटींग करत असू तर पुढे रिप्लाय काय येईल, टीव्ही पाहत असताना सिरीयल पाहत असतो त्यामध्ये पुढे काय होईल, क्रिकेट पाहताना पुढे काय होईल, किंवा चित्रपट पाहताना पुढे काय होईल, याची उत्सुकता लागून राहते त्यामुळे झोप येत नाही. यासाठी टीव्ही आणि मोबाईल आपल्यापासून दूर ठेवणे कधीही चांगले.

तिसरा उपाय आहे; डोळे उघडझाक करणे.. एक ते दोन मिनिटं सतत डोळे उघडझाक केल्यास डोळे जड झाल्याचे समजून येईल, हे करताना सतत करावे, असे एक ते दोन मिनिटे करताच झोप आल्याचे जाणवेल व शांत मन ठेवून, झोपी जावे. व हा प्रयोग करत असताना अनावश्यक विचार मनामध्ये आणू नये, जेवढ्या वेळात तुम्ही डोळे उघडझाक कराल तेवढे तुमचे डोळे जड येतील आणि झोप आल्याचे जाणवेल.

चौथा उपाय आहे; झोपण्या आधी हात पाय व तोंड स्वच्छ धुवून घ्या हे धुताना कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करावा. तसेच दुधाचे रात्री सेवन करावे, झोपण्या आधी दूध पिल्याने पोटालाही आधार मिळतो, व रात्री दूध पिणे शरीरासाठी खूप चांगले असते.

त्यामुळे कोमट किंवा गरम दूध पिल्याने शरीराला ताकद मिळते व झोप येण्यासाठी मदत होते. म्हणूनच रात्री झोपण्या आधी फ्रेश व्हा आणि दूध प्या.. त्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागेल आणि दूध पिल्यामुळे रात्री वारंवार जाग ही येणार नाही. हे चार उपाय तुम्ही करून पाहा तुम्हाला 100% झोप लागेल आणि कोणताही झोपेचा त्रास होणार नाही…

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *