सुपरस्टार रवीना टंडन व अक्षय कुमार यांची सुपरहिट फिल्म ‘मोहरा’चे गाणे ‘टिप-टिप बरसा पानी’ सगळ्यात बोल्ड गाण्यांमधील एक आहे. या गाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये बोल्डनेस आणि रेन रोमांसचा एक नवीन आणि वेगळा असा ट्रेंड सुरु केला.
या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत पावसात भिजत तिने जी बोल्ड अदा दाखवली आणि ज्या पद्धतीने तिने अक्षयबरोबर रोमान्स केला त्याला आजही चाहत्यांची पसंती मिळाली आहे. हे गाणे अक्षयबरोबर शूट करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. तिने हा खुलासा केला कि ह्या गाण्याच्या शुटींगच्या वेळी तिला खूप ताप आला होता.
इतकेच नव्हे तर तिची पाळी सुरु होती आणि तिला त्याचा फार त्रास होत होता. असे असतानाही तिने खूप उत्तम प्रकारे हे शुटींग पार पाडले. आरोग्याच्या कारणाने शुटींग पुढे ढकलण्याबाबत रवीना सांगते कि तिने या डेट्स आधीच फायनल केल्या होत्या ज्यात तिला बदल करायचा नव्हता. तिने दिलेल्या वचनापासून तिला अजिबात मागे हटायचे नव्हते.
हे शुटींग चार दिवस चालले आणि ते एका कंस्ट्रक्शन साइटवर चालू होते जिथे सर्वत्र खिले आणि दगड पडलेले होते. एक तर रवीनाची तब्बेत चांगली नव्हती त्यात तिला या गाण्यात अनवाणी शूट करायचे होते, इतकेच नाही तर भिजायचेही होते. तिच्यासाठी हे खरच एक मोठे आव्हानच होते असे म्हणता येईल.
रवीनाने सांगितले कि त्या गाण्यात आर्टिफिशियल केला गेला होता ज्यातील पाणी इतके थंड होते कि तिला त्यामुळे ताप आला. गाण्यातील तिच्या मेहनतीने रंग भरले आणि तो तिच्या करियरचा एक महत्वाचा टप्पा ठरला.
या गाण्याच्या शुटींगदरम्यान रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे अफेयर चालू होते. हे गाणे १९९४ मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटातील आहे.