मुलतानी माती मध्ये या २ वस्तू मिक्स करून लावा, १ आठवड्यात सावळा रंग उजळेल…

हल्लीच्या प्रदूषणाच्या काळामध्ये कडक उन्हाने त्वचा काळी पडणे ही सामान्य समस्या झाली आहे. जर आपली त्वचा काळी पडत असेल, तर मुलतानी मातीचा प्रयोग करून पहा. आपण त्याचा पॅक घरीच तयार करू शकता. त्याला नियमित चेहेर्‍यावर लावल्याने त्वचेला आतून तजेला येतो.

मुलतानी माती चेहेर्‍याला तजेला आणण्यासाठी उपयोगी होते. परंतु, बर्‍याच लोकांना याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची माहिती नसल्यामुळे ते याचा फायदा घेऊ शकत नाहीत. चेहर्‍याला तजेलदारपणा आणण्यासाठी मुलतानी मातीचा उपयोग मुलींपासून ते मुलांपर्यंत सर्वच करतात.

आज आम्ही तुम्हाला तो पॅक बनवण्याबद्दल सांगणार आहोत. जर आपण याचा एक दिवसाआड वापर केलात, तरी तुमच्या त्वचेचा काळेपणा दूर होईल. त्याचबरोबर असे काही लोक ज्यांच्या त्वचेचा रंग बाहेरून दिसून येत नाही, या पॅकच्या मदतीने त्यांच्या त्वचेला चमकदारपणा येईल. या पॅकमध्ये मुलतानी मातीचा उपयोग केला जातो.

जी आपल्या त्वचेला हलकी व चमकदार करण्याचे काम करते. त्याचबरोबर, ती त्वचेवरील तेलकटपणा दूर करून त्वचेला ताजीतवानी बनवते. चला तर मग जाणून घेऊया, त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी हा पॅक कसा बनवितात. साहित्य: मुलतानी माती – २ चमचे , एलोवेरा जेल – १ चमचा , लिंबू – १/२ कापलेले, गुलाबपाणी- जरुरिप्रमाणे , हळद – चिमटीभर

बनवायची पद्धत: १. या सर्व वस्तु एक एक करून वाटीत घेऊन मिसळा. २. याची पेस्ट जास्त पातळ नको व खूप घट्ट नको. ३. जेव्हा सगळ्या वस्तु बरोबर एकत्र होतील, तेव्हा चेहर्‍यावर ब्रश किंवा हाताने हा पॅक लावा. ४. हा फेस पॅक आपला चेहरा, मान आणि कानावर लावा. ५. हा चेहर्‍यावर १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.

फेस पॅक लावण्याचे फायदे: जर तुमची त्वचा सूर्यकिरणांमुळे बर्न होऊन काळी पडली असेल, किंवा तेलकट असल्यामुळे त्यावर खूप काळे डाग व मुरूमे आली असतील, तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. हा पॅक त्वचेच्या आतील थर खोलवर स्वछ करतो, त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा दूर होतो. यात घातलेल्या लिंबामुळे त्वचा त्वरित चमकदार होते. तसेच, हळद चेहर्‍यावरील डाग व मुरूमे यांना दूर करते व त्वचा चमकदार बनविते.

हा पॅक बनवण्यासाठी घरीच मुलतानी माती वाटून बारीक करून घ्या. कारण बाजारातील मुलतानी मातीत काही अशी केमिकल्स असतात, की ती तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात. जर तुमची इछा असेल, तर तुम्ही हा पॅक आईस क्‍यूब मध्ये बनवून ठेवून फ्रीज मध्ये ठेवा व रोज चेहेर्‍याला लावू शकता. तुम्हाला नक्कीच त्याचा प्रत्यय येईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *