मुतखडयाचा त्रास आहे का ? पाण्यात हा पदार्थ टाकून सकाळी उपाशी पोटी ८ दिवस प्या…

आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. अशातच आबालवृद्धांमध्ये वाढणारा एक त्रास म्हणजे मूतखडा किंवा किडनीस्टोन. मूतखड्याचा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्यामधून सुटका मिळवण्यासाठी वेळीच त्याचं निदान करणं आवश्यक आहे. 

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाचा ताण किंवा दुर्लक्षामुळे बरेचदा पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे अचानक ओटीपोट, पाठीत होणाऱ्या वेदना जाणवू लागतात आणि मग निदान झाल्यावर लक्षात येते की, मुतखडा झाला आहे. मुतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजारा आहे.

मुतखडा घरगुती उपाय : माझं नाव  राहुल प्रकाश साळवे. मी जालना येथील रहिवासी आहे. माझं अधून मधून थोडं पोट दुखत होत..पण एका दिवशी फार जास्त दुखायला लागलं तर मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. मी (सहा दिवस) हॉस्पिटलमध्ये होतो. तिथे माझी सोनुग्राफी करण्यात आली. तर सोनुग्राफी मध्ये मला मुतखड्याचा प्रॉब्लेम सांगितला. (

मुतखड्यांची साईज 11mm, 9mm, 8mm, 13mm, 6mm, आणि 22mm अशी होती, एकूण सहा ) तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल अस सांगितलं, पण मी आर्थिक परिस्थिती मुळे ऑपरेशन करू शकलो नाही ..

अशातच माझी ओळख ( राजु मामा गोल्हार) यांच्याशी झाली. त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन करून आयुर्वेद उपाय सांगितले आणि मी ते केले .(उपाय असा होता की मी बाजारातून एक किलो हुलगे आणले आणि त्याचे समान 10 भाग केले व रोज रात्री एक भाग पाण्यात धून भिजू घालायचा आणि ते हुलगे सकाळी आणखी थोडं पाणी टाकून चांगले उकळून घ्यायचे . उकळल्यानंतर ते पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचं .आणि ते राहिलेले हुलघ्यांची उसळ करून रोज खावी ..

असं मी सलग 8 दिवस केलं आणि एका महिन्यानंतर सोनूग्राफी केली तर एका महिन्यामध्ये माझे 4 खडे विरघळून पडले आणि 2 राहिलेत ते ही काही दिवसात पडून जातील. असे त्यांनी मला सांगितले आहे व पुन्हा शरीरात मुतखडा तयारीच होणार नाहीत या साठी आैषध घेणार आहे न ऑपरेशन करता. आणि एक रूपये न खर्च करता. आता मी ठणठणीत आहे ..

आरोग्य संवाद गृप व राजु मामा गोल्हार यांच्या मुळे मी न ऑपरेशन करता आज मुतखडा या आजारापासून मी पूर्ण पणे ठीक आहे. राजू मामा गोल्हार यांचा मी खूप खूप मनातून ऋणी आहे. माझं नाव :- राहुल प्रकाश साळवे, जालना.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.