करोडपती असूनही साधेपणाने जगतात आयुष्य, ‘कालीन भैया’ पंकज त्रिपाठी यांचा थक्क करणारा जीवनप्रवास…

आज आम्ही तुम्हाला एका बॉलिवूडच्या अभिनेत्याविषयी सांगणार आहोत ज्यांचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास खूपच कठीण परिस्थितीतून झाला आहे. आम्ही सांगत आहोत, बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीबद्दल. बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील अभिनेता पंकज त्रिपाठी हे खूपच अडचणीच्या परिस्थितीत आपले आयुष्य जगले आहेत.

त्यांनी आपल्या विश्वासाने आणि मेहनतीने आपले नशिब बदलले आहे. पंकज त्रिपाठी यांनी कधी कठीण काळही बघितला आणि एका खोलीत आपले आयुष्य घालवले आहे, पण आज पंकज त्रिपाठी यांच्या मेहनती तसेच ध्येय निष्ठेच्या जोरावर ते आज लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलिवूडचा हा एक असा अभिनेता आहे, जो कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा निभावू शकतो, कोणत्याही भूमिकेत प्रेक्षक त्याला पसंत करतात. चला तर मग, आज आम्ही बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीबद्दल सांगणार आहोत:

पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपाळगंजमधील छोट्याशा गावात राहत होते. तिथे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. पण पंकजने काही स्वप्ने बघितली होती, व ती त्याला विसरायची नव्हती, म्हणून तो अविरत प्रयत्न करीत राहिला. यात त्यांच्या पत्नीनेही त्यांची साथ सोडली नाही. त्याची पत्नी त्यावेळी नौकरी करायची, तिच्या पैशाने संपूर्ण घराचा उदरनिर्वाह चालत असे. असेच दिवस जात राहिले, आणि पंकज त्रिपाठी यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. ते अविरत मेहनत करत राहिले.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकज त्रिपाठी यांनी एनएसडी मधून अभिनय अभ्यासक्रम सुरू केला. त्यानंतर पंकज यांनी मुंबईत येण्याचे ठरवले. परंतु जेव्हा ते मुंबईला आले, तेव्हा तेथे ते कुणालाही ओळखत नव्हते. म्हणूनच त्यांना बर्‍याच अडचणींचा तोंड द्यावे लागले. त्याना राहावयास जागा नव्हती, किंवा त्यावेळी ते कोणतेही काम करीत नव्हते, म्हणून त्याच्याकडे पैशांचे कोणतेही साधन नव्हते. परंतु असे म्हणतात ना की, कठोर परिश्रम घेणार्‍यांचा कधीही पराभव होत नाही. एक ना एक दिवस त्यांना यश मिळतेच.

पंकज त्रिपाठी यांनीही हार मानली नाही आणि मुंबईत आपले कठोर परिश्रम चालू ठेवले. हळूहळू त्यांच्या मेहनतीला यश मिळायला सुरवात झाली आणि त्यानी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले पाय घट्ट रोवले. आजही ज्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये त्यानी आपले वर्चस्व निर्माण केले आहे, त्यांचे लाखो चाहते आहेत, ते सर्व त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे.

जिथे काही काळापूर्वी पंकज त्रिपाठी यांना मुंबईत राहायला जागा नव्हती, तर तिथे आज स्वत:च्या मेहनतीने त्यांनी मुंबईत एक बंगलाही विकत घेतला आहे. या बंगल्यात ते आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत आरामात आपले आयुष्य घालवत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.