व्यक्तीचे खराब भाग्य देखील बदलतात शनिदेव, शनिवारी संध्याकाळी करा हा उपाय, होईल दुःखाचा अंत…

शनिदेव हे दुर्दैव बदलणारे देवता मानले जातात. शनिदेव हे न्यायाची देवता आहेत असे म्हटले जाते. ते मनुष्याच्या कर्मांनुसार त्याला फळ देतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचा आशिर्वाद भक्तांवर कायम राहतो. सध्याच्या काळात असे बरेच लोक आहेत, जे शनिदेवाना संतुष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना करतात, जेणेकरून त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणी व त्रास यातून मुक्तता मिळेल. शनिदेवाची उपासना केल्यास शनिदेवांपासून होणारे दुष्परिणाम दूर होतात. आज आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपायांबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्ही शनिवारी सायंकाळी केल्यास शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.

शनिवारी शनिदेव यांना या प्रकारे प्रसन्न करा: शनिदेवाच्या समोर सुंदरकांडचे पठण करा. शनिवारी संध्याकाळी आपण कोणत्याही शनिमंदिरात जाऊन शनिदेव यांच्या समोर बसून तेथे सुंदरकांड याचे वाचन करू शकता. जेव्हा सुंदरकांडचे तुमचे वाचन पूर्ण होईल, त्यानंतर तुम्हाला ” नीलांजन समाभासं रवि पुत्रां यमाग्रजं।, छाया मार्तण्डसंभूतं तं नामामि शनैश्चरम्., या मंत्राचा जप करावयाचा आहे.

संकटापासून मुक्त होण्यासाठी: अशी जर तुमची इच्छा असेल, की आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावीत, तर तुम्ही शनिवारी संध्याकाळी काळी गाय किंवा काळ्या कुत्र्याला भाकर खायला द्या. जर आपल्याला काळा कुत्रा सापडला नाही, तर अशा स्थितीत आपण कोणत्याही कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालू शकता.

गोकर्णाचे निळे फुल शनिदेवाला अर्पण करा: शनिवार हा दिवस शनिदेवाची उपासना करण्यासाठी खास मानला जातो. तुम्ही शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या पूजेच्या वेळी गोकर्णाचे निळे फूल शंनिदेवाला अर्पण करा. असे मानले जाते, की हा उपाय करून शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आम्ही तुम्हाला सांगतो, की शनिदेव यांना गोकर्ण हे फूल खूप आवडते.

या व्यतिरिक्त तुम्ही गोकर्णाचे फूल हातात घ्या, शनिदेवाला तुमची समस्या सांगा, त्यानंतर, हातातले फूल कोठेही वाहत्या पाण्यात विसर्जित करा. जर तुम्ही काही कारणास्तव हे फूल वाहत्या पाण्यात सोडू शकत नसाल, तर आपण ते मातीमध्ये पुरून टाकू शकता.

वटवृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा: शनिवारी संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वडाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याच झाडाखाली बसून शनिदेवाचा मंत्र ” ओम शं शनैश्चराय नमः” चा जप करावा. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्या जीवनातील दु: ख दूर होतील.

या उपायाव्यतिरिक्त, आपण शनिवारी रात्री वडाच्या झाडाच्या मुळाजवळ एक चौमुखी दिवा लावावा. असे मानले जाते, की या उपायाने शनिदेवाची अव्याहत कृपादृष्टी तुमच्यावर राहते आणि शनिदेवाच्या साडेसातीपासून तुमची सुटका होते व त्याच्या दुष्परिणामांपासून तुम्हाला मुक्तता मिळते.

गरजूंना देणगी आपण शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना काळा कपडा, काळ्या चप्पल इत्यादी दान करु शकता. शनिवारी संध्याकाळी कुष्ठ रोग्यांना काळ्या वस्तूंचे दान करा. टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published.