चाणक्य नीतीनुसार हे काम करणारे व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाहीत….

आचार्य चाणक्य यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार व इतर काही महान व्यक्तींच्या लेखणीतून या पाच व्यक्तींचे जीवन कसे असेल, हे आपण पाहणार आहोत, एक म्हण आहे, या जन्मात जे कराल, ते या जन्मात फेडावे लागणार…., त्यानुसार तुमच्या ही आसपास काही उदाहरणे पाहायला मिळतील. जे वाईट काम करतात त्यामुळे त्यांना मानसिक सुख व शांतता मिळत नाही, समाजामध्ये असे ही व्यक्ती पाहायला मिळतात जे सुखी असल्याचा देखावा तर जरूर करतात, पण ते आतून खूप खचलेले असतात.

अशा लोकांच्या पापाचा घडा जेव्हा पूर्ण भरतो तेव्हा जगणे मुश्किल बनते. तुम्हीसुद्धा अशा वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊ शकता जे तुमच्या जवळपास असतील ते सुखी कधीही नसतात, तर चला ते कोण आहेत या विषयी जाणून घेऊ, पहिला आहे दा रू व इतर मादक द्र व्यां चा व्यापारी….

जो व्यक्ती दा रू, च र स, गां जा, सारखे जीवन बरबाद करणारे पदार्थ विक्री करतो, असे व्यक्ती कधीही सुखी नसतात, दा रू, सि ग रे ट, मादक द्रव्य, यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे जीवन बरबाद होते, याचा परिणाम त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो, म्हणून असे पदार्थ विक्री करणारा व्यक्ती सतत टेन्शन व घाबरलेल्या अवस्थेत आढळतो…. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबालाही भोगावा लागतो, याचा अभ्यास तुम्ही गावातील दा रूच्या विक्रेता वर करू शकता? त्या विक्रेताची डिटेल मध्ये माहिती द्या तुम्हाला समजेल तो कसे भोग भोगत आहे.

दुसरा आहे गुंड प्रवृत्ती किंवा इतर मार्गाने पैसा कमावणे जे व्यक्ती गुंड प्रवृत्ती किंवा इतर वाईट मार्गाचा अवलंब करून पैसा कमावतात ते सुखी राहू शकत नाही, म्हणून गैरमार्गाचा अवलंब करून कधीही कोणाला लुबाडू नका, व पैसे कमवू नका. तिसरा आहे परस्त्रीकडे वाईट नजर भारतीय संस्कृतीमध्ये परस्त्रीला माता मानली जाते, जो व्यक्ती वाईट हेतूने परस्त्री सोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, तो कधीच सुखी राहू शकत नाही. व असे केलास त्या व्यक्तीची व स्त्रीचे सुद्धा कुटुंब उ द्ध्व स्त होते, जीवण मुश्किल बनते त्यामुळे कोणत्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नका किंवा गैरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करू नका.

चौथा आहे दूषित राजकारण जो व्यक्ती स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी इतरांना फसवतो किंवा कोणत्याही वाईट मार्गाला जाण्यास तो भाग पाडतो असे व्यक्ती जीवनभर सतत दुःखी राहतात.

पाचवा हे जाति धर्माचा गैरवापर भारतीय संस्कृतीमध्ये व समाजामध्ये जेवढे धर्म पाहायला मिळतात, ते सर्व चांगलीच शिकवण देतात, प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ हे उत्तम व्यवहार, संस्कार, राहणीमान, हे कसे असावे हे सांगतात पण काही व्यक्ती त्याचा गैरफायदा घेत आपल्या स्वार्थासाठी दोन धर्मांमध्ये क्लेश निर्माण करतात, असे व्यक्ती सुखी राहू शकत नाही, म्हणून काही पैशांसाठी दुसऱ्यांचे जीवन बरबाद करू नका, प्रामाणिकपणे जेवढ करता येईल तेवढ करा त्यामुळे तुमचे जीवन सुखी व समृद्ध बनेल जर

तुम्ही या पाच मार्गापासून दूर राहिला तर तुमचे जीवन सुखी व समृद्ध बनेल…. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.