आजकालच्या या यंत्र युगात आपल्या जीवनात यंत्र किंवा उपकरणे यांचा वापर इतका जास्त झाला आहे, की आपली कामे जास्त करून ही यंत्रेच सोपी करतात. जसे की, कणीक भिजवणे, भाज्या ताज्या ठेवणे, वाटण करून ठेवणे. आपली कामे ही यंत्रेच करतात. हल्लीच्या दिवसात सर्वांच्या घरात फ्रीज तर जरूर असतो आणि आपण याचा वापर खाण्याच्या वस्तु टिकवून ठेवण्यासाठी करतो. कारण त्यामुळे त्या वस्तु ताज्या राहू शकतील आणि जंतुमुक्त राहू शकतील, असे आपण मानतो. पण हेच फक्त सत्य नाही, त्याचे दुष्परिणाम पण आहेत.
आजच्या काळात लोकांचे राहणीमान खूप बदलले आहे. त्याच वेळी, लोकांकडे स्वत:कडे लक्ष द्यायला वेळही नाही. व्यस्त वेळापत्रकांमुळे महिला दुसर्या दिवशीची कामे एक दिवस आधीच करून ठेवतात. त्यातील मुख्य काम, म्हणजे बर्याचदा फ्रिजमध्ये कणीक भिजवून ठेवतात किंवा उरवून ठेवतात. दुसर्या दिवशी तीच कणीक घेऊन पोळ्या करतात. त्यांच्या या सवयीमुळे बर्याच आजारांना आपण आमंत्रण देत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही.
फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक वापरल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात हानी पोहचते हे कोणालाही बहुधा माहिती नाही. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला फ्रीजमध्ये पीठ ठेवून काय नुकसान होते, त्याबद्दल सांगणार आहोत. फ्रीजमध्ये भिजवलेले पीठ ठेवून त्याच्या चपात्या किंवा पोळ्या खाल्ल्याने काय नुकसान होते, ते जाणून घेऊया.
तज्ञांचे असे म्हणणे आहे, की पीठ मळल्यानंतर ते लगेचच वापरायला हवे, कारण ते पाण्याच्या संपर्कात आल्यावर पीठात अनेक रासायनिक बदल होतात आणि फ्रीजच्या हानिकारक किरणाच्या संपर्कामुळे, पीठ जास्त खराब होते. म्हणून आपण जेव्हा त्या कणकीच्या पुन्हा पोळ्या करतो, तेव्हा तुम्हाला होणार्या आजारांची संख्या वाढते. ह्या समस्या होतात.
पोटात गॅस होणे: आजच्या काळात बहुतेक लोकांना पोटाच्या तक्रारी असतात. लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोक या समस्येशी झगडत असतात. पोटात गॅस होणे, अपचन होते, बद्धकोष्टता होणे, अन्न पचन न होणे, यासारख्या समस्या तर हल्ली बहुतेक लोकांमध्ये आढळतात.
आताच्या काळात पौष्टिक आहार घेण्याऐवजी फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडचे सेवन जास्त केले जात आहे. त्यामुळे पोटात गॅसची समस्या वारंवार होते आहे. अशा स्थितीत पोट फुगणे, पोट दुखणे, तसेच आंबट ढेकर येणे हे सुरू होते
आताच्या काळात बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्भवणार्या कितीतरी स्वाथ्यविषयक समस्या आहेत. त्यात जर तुम्ही असे रात्री तयार करून ठेवलेले पदार्थ वापरलेत, तर मात्र तुम्हाला होणार्या आजारांपासून कोणी वाचवू शकणार नाही. म्हणूनच, फ्रीज जरूर वापरा, ती तर काळाची गरज आहे. पण शक्यतो, रोजच्या रोज ताजे अन्न शिजवा व त्यांचे सेवन करून आपली तब्येत सांभाळा. स्वत:ला तंदुरुस्त ठेवा.
मित्रांनो आम्ही अशा करतो की आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून सांगा……!!