तुमच्या जीवनातल्या या 3 लोकांपासुन सदैव दूर रहा नाहीतर ते तुम्हाला….

प्रत्येकाच्या जीवनात जसे चांगले लोक असतात, तसेच वाईट लोक देखील असतात. परंतु अनेक वेळा समजत नाही चांगला कोण आणि वाईट कोण.. कश्या प्रकारे वाईट लोक कोण आहेत हे आपण ओळखू शकतो?, तर चला आपण ते कसे ओळखावेत ते जाणून घेऊ. व त्यानुसार आपल्याला वाईट लोकांपासून दूर राहता येईल.

पहिले लोक आहेत तुमची स्तुती करणारे…. होय स्तुती करणारे, सतत तुमचे कौतुक करणारे, आता प्रश्न पडेल की, आई वडील तर जास्त स्तुती करतात, काही लहानपणीचे मित्र देखील कायम स्तुती करत असतात. मग याचा अर्थ त्यांच्या पासून दूर राहायचे का?, आई वडील व काही खरे मित्र कौतुक तर करतातच, पण गरज पडल्यावर ओरडतात, चुका दाखवतात, वाईट मार्गावर जाण्यापासून रोखतात, कौतुक तर जरूर करावं पण जिथे चुक होते ते दाखवायला हवी.

एखाद्या वेळेस कौतुक नाही केले तरी चालेल पण चूक ही दाखवायलाच हवी. वाईट मार्गापासून तुम्हाला दूर ठेवायला हवे. जे स्वार्थी लोक असतात ज्यांना फक्त तुमचा फायदा घ्यायचा असतो, असे लोक गोड बोलून त्यांचा स्वार्थ पूर्ण करून घेत असतात. तुम्हाला म्हणतील तू खूप चांगला व्यक्ती आहेस सर्वांना मदत करतोस, माझा बेस्ट फ्रेंड आहेस असे काही बोलून शेवटी उधार पैसे मागतात, किंवा इतर दुसरे कोणतेही काम सांगतील. त्यामुळे नेहमी गोड बोलणाऱ्या आणि कौतुक करणाऱ्या व्यक्तींपासून शक्यतो दूरच राहा.

दुसरी आहेत गरज पडल्यावर आठवण काढणारी…. काही मित्र मैत्रिणी नातेवाईक असे असतात ज्यांची ओळख खूप जुनी असते, त्यांच्या सोबत खूप चांगली ओळख असून देखील ते तुम्हाला कधी तरी फोन करतात, फक्त त्यांना गरज असताना किंवा तुमची मदत हवी असताना ते तुमच्याशी संपर्क साधतात. त्यांना फक्त तुमच्या पैशाची गरज असते, तुमच्या मदतीची गरज असते.

तुमचे नाते कसे आहे व केवढे दृढ आहे याच्याशी त्यांचे काहीही देने घेणे नसते. तुमच्या सुख दुःखात ते कधीही साथ देत नाहीत. तुमचे काही मित्र आणि मैत्रिणी असतील जे कधी तरी मॅसेज किंवा कॉल करतात ते ही कामासाठीच, स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी…. असे लोक फक्त आणि फक्त ओळखीचा फायदाच करून घेत असतात. tयामुळे स्वार्थासाठी ओळख ठेवणाऱ्या लोकांपासून दूर राहा.

तिसरे लोक आहेत तुमच्या खाजगी जीवनात हस्तक्षेप करणारे…. समाजात असे काही लोक पाहायला मिळतात, जे सतत दुसऱ्याच्या प्रायव्हेट जीवनात डोकावण्याचा प्रयत्न करत असतात. तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये काय सुरू आहे, याची माहिती काढण्याचा ते पर्यन्त करतात. तुमचे विक पॉईंट कोणते आहेत, तुमची कमजोरी काय आहे, सर्व काही तुमच्या कडून काढून घेतात, तुम्हाला वाटते याला आपली किती काळजी आहे आपुलकीने तो सर्व विचारत आहे, आपल्या मनावरचा भार कमी होईल, या विचाराने तुम्ही सर्व काही त्याला सांगून मोकळे होता.

त्यानंतर मात्र त्याचे वाईट परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या व्यक्तीला सर्व काही सांगितले तोच पुढे धोका देतो. तुमच्या कमजोरीचा फायदा घ्यायला सुरुवात करतो, संपूर्ण समाजामध्ये तुमच्या खाजगी जीवनातील माहिती पसरवतो, विनाकारण तोच मुद्दा तुमच्या बदनामीचा कारणीभूत ठरतो. तुमचे काही मित्र मैत्रिणी तुमची बदनामी करतात, ऑफिसमधून तुमच्याबद्दल माहिती घेणार व्यक्ती तुम्हालाच विरोध करू लागतो.

राजकारणात तुमचाच चेला कालांतराने तुमचा विरोधक बनतो. म्हणून अशा सर्व स्वार्थी लोकांपासून सावध व दूर राहा…. आता लगेच विचार करा आणि शोधा तुमच्या सोबत वाईट वागणार कोण असा व्यक्ती आहे, असे कोण लोक आहेत जे फक्त स्वार्थासाठी तुमचा उपयोग करून घेतात, तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात वेळीच सावध व्हा…. आणि त्यांचा पासून दूर राहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.