ताजमहालाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुनेच्या काठी असलेले एक सुंदर असे स्मारक आहे. हे जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे. ताजमहाल हे मोगल स्थापत्यकलेचा एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. ताजमहालचे पांढरे घुमट आणि टाइल संगमरवरीचे बनलेले आहेत. उस्ताद अहमद लाहोरी हे त्याचे मुख्य डिझाइनर मानले जातात. मुगल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताजमहालाला भेट देतात

जगातल्या सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य ताजमहाल आहे असे मानले जाते. ताजमहालच्या सुंदरतेचे कौतुक करायला दूर दूर पासून लोक येतात. जगातल्या कांनाकोपर्‍यातून लोक ताजमहाल बघायला व त्याचे कौतुक करायला येतात. आज आम्ही तुम्हाला, आमच्या या खास लेखाद्वारे, शाहजहान यांनी आपली राणी मुमताज हिच्या आठवणीत बनवल्या गेलेल्या या वस्तूच्या खास असलेल्या पाच गोष्टी सांगणार आहोत.

१. काही लोकांचे असे म्हणणे आहे, की ताजमहाल दिवसा कितीतरी प्रकारच्या रंगात दिसतो, परंतु, हे खरे नाही, ताजमहाल पांढर्‍या शुभ्र संगमरवरचा बनलेला असल्यामुळे, ताजमहालावर सूर्याची किरणे पडतात. हेच नेमके कारण आहे, की ताजमहाल सकाळी सोन्यासारख्या रंगाचा व संध्याकाळी गुलाबी रंगाचा दिसतो.

२. शाहजहांचे दफन करण्यासाठी ज्या वाटेने त्यांचे शव ताजमहाल मध्ये आणले गेले, ते विटेनी बंद करण्यात आले होते, त्यामुळे आता तेथे कोणताही दरवाजा नाही.

३. ताजमहालच्या बाबतीत असे म्हटले जाते, की येथे शाहजहां आणि मुमताज यांच्या कब्रिवर पाणी ठिबकत राहाते, परंतु, हे सत्य नाही, तर उर्सच्या वेळेस ताजमहालात खूपच गर्दी असते. त्यामुळे हवेतील बाष्प वाढते. दरवाज्यावर पाण्याचे थेंब जमा होतात. गर्दी कमी झाली, की हे थेंब नाहीसे होतात.

४. असे म्हटले जाते, की शाहजहांनी ताजमहाल बनवणार्‍या २० हजार कारागिरांचे हात शाहजहांने कापून टाकले, परंतु असे काहीही घडले नव्हते, ही गोष्ट म्हणजे एक अफवा आहे. त्यातील खरे हे आहे, की शाहजहांने कारागिरांकडून यापुढे जीवनात हे काम कधीही करणार नाही असे वचन घेतले होते. त्याच्या मोबदल्यात त्यांना जीवनभर पगार मिळेल असे त्याने कबुल केले होते.

५. असे म्हटले जाते, की ताजमहाल बनवणार्‍या शाहजहांनचा मृत्यू त्यांची पत्नी मुमताज यांच्या निधनाने त्यांना दू:ख झाले त्यामुळे झाला, परंतु, ही गोष्ट खरी नाही, शाहजहांचा मृत्यू हा मरणाच्या अफवांमुळे त्यांच्या मुलांमध्ये यु द्धं झाले. औरंगजेब जिंकला आणि त्याने शाहजहांला आपला बंदी बनविले. त्यानंतर, आजारपणात ७४व्या वर्षी शाहजहाचा मृत्यू झाला.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *