तसे बघितले तर शेंगदाणे ही सगळ्यांची आवडती व वेळ घालवण्यासाठी (टाइम पास) वस्तु आहे. हल्ली बाजारात तुम्हाला शेंगदाणे छोट्या छोट्या पाकीटातून उपलब्ध आहेत. लहान थोर कोणीही मूठभर शेंगदाणे सहज विकत घेऊन खाऊ शकतो.
शेंगदाणे हे एक मजेशीर अशी पोषण तत्व असलेली खाण आहे आणि त्याच्या पोषण क्षमतेचे वर्णन इतिहासापासून ते विज्ञानापर्यन्त केले जाऊ शकते. हा एक संपूर्ण आहार आहे आणि कितीतरी चांगले तत्व, म्हणजेच, लोह, जस्त, मैगनेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे या सगळ्याचे चांगले स्त्रोत हे शेंगदाण्यात आहेत.
शेंगदाण्यात स्वत:ची अशी एक गोडी असते, परंतु, खूप कमी लोकांना माहीत असेल, की ते तब्येतीसाठी शेंगदाणा खूपच फायदेशीर आहे. यापासून बनवलेले तेल व लोणी हे आपल्या तब्येतीसाठी उत्तम आहे. शेंगदाण्यात योग्य प्रमाणात प्रोटीन असते, जे शरीराच्या विकासासाठी जरूरी आहे. जे लोक दुधाचे सेवन करीत नाहीत, त्यांनी जर रोज शेंगदाणे खाल्ले, तर दुधात मिळणार्या पोषक तत्वांइतकीच पोषक तत्वे त्यांना मिळतील. शेंगदाणे खाल्ल्यामुळे हाडे मजबूत होतात.
शेंगदाण्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित राहाते. म्हणून पोटासाठी हे अत्यंत उपयोगी आहेत. थकवा असा एक आजार आहे, किंवा वैफल्य जो हल्ली सगळ्या लोकांमध्ये दिसून येतो. थकवा तेव्हाच येतो, जेव्हा शरीरातील सेरोटोनिन नावच्या द्रव्याचे प्रमाण कमी होते. शेंगदाणे खाल्यामुळे मन शांत राहाते. ते अशामुळे, की शेंगदाण्यात ट्रीपटोफॅन नावाचे द्रव्य आहे, जे सेरोटोनिन नावाच्या द्रव्याची वाढ करते.
बदामाच्या तुलनेत शेंगदाण्याचे अधिक लाभ आहेत. याला स्वस्त “बदाम” अशी उपमा दिली आहे. गरीबाना बदाम खाणे शक्य नसते, त्यांनी शेंगदाणे खाऊन ती कमतरता भरून काढावी. १०० ग्राम कच्य्या शेंगदाण्यात १ लिटर दुधाएवढे प्रोटेन्स असतात. तर भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये अधिक प्रमाणात खनिजे असतात जी २५० ग्राम मांसाच्यात असलेल्या खनिजापेक्षा थोडी कमी असतात. शेंगदाणे कोलस्ट्रोल कमी करायला मदत करतात.
हे हृदयरोगापासून पण संरक्षण करतात. म्हणूनच याचे सेवन जरूर केले पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे, प्रोटेन्स शरीरसाठी खूप जरूरी आहेत. हे खाल्ल्यामुळे जुन्या पेशींचे नव्या पेशीत रूपांतर होते, जे आजाराशी लढा देण्यासाठी अतिशय जरुरीचे आहे. याच्या सेवनाने, प्रोटीन्सची कमतरता नाहीशी होते.
गर्भवती स्त्रीने रोज शेंगदाणे खाल्ले पाहिजेत, ते तिच्या गर्भासाठी उत्तम आहे. ते गर्भावस्थेत शिशूच्या वाढीसाठी मदत करतात. त्याशिवाय, रोज ५०-१०० ग्राम शेंगदाणे खाल्ल्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहाते. अन्नाचे सहज पचन होते आणि शरीरात एनिमिया होत नाही. शेंगदाण्यात मिळणारे तेल हे पोटासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे खाल्यामुळे अपचन, गॅस, अॅसिडिटी या सर्व विकारांपासून आराम पडतो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उच्च प्रोटीन असलेले खाद्यपदार्थ खाणे हे चांगले पण ते योग्य प्रमाणातच खावेत. नाहीतर ते नुकसान करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.