अमिताभ बच्चनची फिल्म “हम” तुम्हाला जरूर आठवणीत असेल, आणि त्या फिल्मचे एक गाणे जे खूप प्रसिद्ध झाले होते, ते आहे, “चुम्मा चुम्मा दे दे”. हे गाणे लोकांच्या ओठावर इतके रेंगाळले होते, की आजही लोक ते गाणे गुणगुणताना स्वत:ला थांबवू शकत नाहीत. आज आम्ही या फिल्म मध्ये अमिताभबरोबर जी अभिनेत्री होती, नाव किमी कार्टरच्याबद्दल तुम्हाला काही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या गाण्याने प्रसिद्ध झालेली ती अभिनेत्री आता कुठे आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे.
तुमच्या माहितीसाठी, ८०च्या दशकातील अभिनेत्री किमी काटकरनी बॉलीवुड मध्ये आपल्या फ़िल्मी करियरची सुरुवात “पत्थर दिल” या फिल्मने सन १९८५ मध्ये केली होती. तुमच्या माहीतीसाठी सांगतो की, ११ डिसेंबर १९६५ मध्ये किमी काटकरचा जन्म झाला.
किमीने बॉलीवुडमध्ये बर्याच प्रसिद्ध अशा फिल्म्स मध्ये काम केले आहे, जसे की “खून का कर्ज”, “सोने पे सुहागा”, “एड्वेंचेर ऑफ़ टार्जन”, “दरिया दिल” इत्यादि. त्याचबरोबर, या फिल्म्सशिवाय किमी काटकरला सर्वात जास्त लोकप्रियता ज्या फिल्मने दिली, ती होती १९९१ मध्ये प्रदर्शित झालेली अमिताभ बच्चन यांची फिल्म “हम”. त्या फिल्ममधील एका प्रसिद्ध गाण्याने “चुम्मा चुम्मा दे दे” किमी कार्टर बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाली होती.
फिल्म “हम” या सिनेमात अमिताभ बच्चन, किमी काटकर यांच्याशिवाय गोविंदा, रवि शर्मा आणि डैनी हे अभिनेते पण महत्वाच्या भूमिकेत होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या फिल्मनंतर किमी काटकरने बॉलीवुडमध्ये फक्त एक शेवटची फिल्म “हमला” मध्ये दिसली होती. नंतर, १९९२ मध्ये किमी काटकरने प्रसिद्ध ऐड फिल्म मेकर आणि फोटोग्राफर शांतनु शौर्य बरोबर लग्न केले होते. त्यानंतर, किमीने कायमस्वरूपी फिल्मजगत सोडले आणि आपल्या पतीबरोबर ऑस्ट्रेलियाला जाऊन स्थायिक झाली.
किमी काटकर आणि शांतनु यांचा एक मुलगा आहे, ज्याचे नाव सिद्धार्थ आहे. तुमच्या माहितीसाठी, किमी कार्टर ही ८०व्या दशकातील बॉलीवुडमधील सगळ्यात बोल्ड अभिनेत्रीपैकी एक मानली जाते. किमीनेच बॉलीवुडमध्ये बिकिनी आणि स्विमिंग सूट घालून फिल्मस मध्ये काम करायला प्रोत्साहन दिले होते. आज किमी काटकर जरी फ़िल्मी जगतापासून दूर गेली असली, तरी एक अभिनेत्री म्हणून लोक तिचे चाहते आहेत आणि तिच्या त्या गाण्यावर लोक त्याच पद्धतीने अजूनही गातात.
कोणताही समारंभ किंवा पार्टी हे गाणे वाजवल्याशिवाय पूर्ण होत नाही. किमी काटकरचे सौन्दर्य आणि त्यांचा अभिनय याचा ताळमेळ इतका अप्रतिम होता, की हेच कारण होते, की प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक किमीला आपल्या फिल्म मध्ये घेऊ इछित होते. पण किमी कार्टर शांतनुच्या प्रेमात वेडी झाली होती की तिने फिल्मी दुंनियेला सोडून दिले व पतीबरोबर औस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली.

मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.