बायको सुंदर दिसत नसेल तर चाणक्य यांचे हे पाच उपाय करा ज्यामुळे….

प्रत्येकाची अशी इछा असते, की त्यांचा जोडीदार सुंदर असावा. खूपच कमी लोक असे असतात, जे स्त्रीचा स्वभाव बघून मोहित होतात. पण प्रत्येकाचा जोडीदार सुंदर असेलच असे नाही. काही वेळेस परिवार आणि परिस्थिति या दबावाखाली व्यक्तिला आपले मन मारून जोडीदार निवडावा लागतो. खास करून हीच गोष्ट त्याच्या मनाला खटकत असते.

यापासून वाचण्यासाठी, आचार्य चाणक्यनी ‘चाणक्य नीति’ मध्ये पुरूषांना असे ५ उपाय सांगितले आहेत, की जे जाणून घेऊन ते आपल्या बायकोवर प्रेम करू शकतात. त्याचबरोबर, जरी त्यांची पत्नी त्यांच्या मनाप्रमाणे सुंदर नसेल, तरीसुध्हा पुरुष आपले मन शांत करू शकतात. आचार्य चाणक्यनी ‘चाणक्य नीति’ मध्ये पुरुषांसाठी पाच उपाय सांगितले आहेत. जे जाणून घेतल्यावर पुरुष नक्की असा अप्रिय परिस्थितीला सांभाळून घेऊ शकतील. पत्नी सुंदर दिसत नाही, मग चाणक्यनी सांगितलेल्या या ५ उपायांनी जीवनात प्रेम आणि सुख वाढेल- काय आहेत ते उपाय चला पाहूया…

रोज सकाळी उठल्यावर आपला चेहरा बघणे: जर तुम्हाला तुमची पत्नी सुंदर वाटत नसेल, तर सकाळी उठल्यावर स्वत:चा चेहरा आरशात बघायला सुरुवात करा. याचा फायदा असा होईल, की तुम्हाला तुमच्यातील दोष दिसून येतील. हा लाभ होईल : रोज आपला चेहरा बघितल्यामुळे स्वत:मध्ये असलेले दोष आपल्याला जाणवतील. या जगात असे कोणीच नाही, जे सर्वगुणसंपन्न आहे. चेहरा बघितल्यामुळे हळूहळू तुम्ही या गोष्टी समजून घ्याल.

पत्नीमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा: प्रत्येक माणसात काहीतरी चांगले नक्की असते. तुम्हाला पण तुमच्या पत्नीचे गोड बोलणे, व्यवहारीपणा याबद्दल विचार केला पाहिजे. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या पत्नीबद्दल प्रेम उत्पन्न होईल. हा फायदा होईल : जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीबद्दल चांगले विचार कराल, तेव्हा तुमच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल.

त्या मुलीची नक्की आठवण करा जिच्यामुळे तुम्हाला दु:ख सहन करावे लागले आहे: प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात कधी ना कधीतरी एक अशी मुलगी जरूर येते, जिच्या वागण्याने आपल्याला दू:ख होते. तिने तिच्या वागण्याने तुम्हाला नक्की दू:खी केले असेल. अशा कटू अनुभवांची आठवण काढली पाहिजे. त्याचा फायदा : या गोष्टींची आठवण तुम्हाला तुमच्या पत्नीच्या जवळ घेऊन जाईल. त्यामुळे, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाने भरून जाईल.

वाईट काळ आठवून बघा: पत्नी हीच फक्त अशी असते, जी आपल्या वाईट काळात आपली प्रथम साथ देते. चाणक्य म्हणतात, कि जेव्हा तुम्हाला असे वाटेल, की आपली पत्नी सुंदर नाही, तेव्हा आपण आपले वाईट दिवस आठवून पहावेत, जेव्हा फक्त आपल्या पत्नीने आपली साथ दिलेली असते. हा होईल फायदा : वाईट काळाची आठवण केल्यामुळे आपला येणारा काळ चांगला होतो, कारण, पत्नीबद्दल तुमच्या मनात सकरात्मकता वाढेल.

स्वत:मधील वाईट गोष्टींची आठवण करा: जास्त करून पुरुषांचा स्वभाव चंचल असतो. अशावेळी कितीतरी न सांगण्यासारख्या वाईट गोष्टी घडतात, ज्या पुरुष आपल्या पत्नीपासून लपवून ठेवतात. पुरुषांनी त्या गोष्टी आठवत राहिल्या पाहिजेत. प्रेम वाढीस लागेल: आपल्या वाईट गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल, की तुमची पत्नी तुमच्याशी किती प्रामाणिक आहे. त्यामुळे तुमच्या दोघांमधील प्रेम वाढेल. ह्या गोष्टी जीवनात समाविष्ट करा व आपल्या विवाहित दोस्त मंडळींना पण सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.