हे वाचल्यानंतर तुम्ही ह्यापुढे चहा केल्यावर उरणारी चहा पॉवडर चुकूनही फेकणार नाही : प्रत्येकाने वाचाच

चहाशौकिनांसाठी आजच्या दिवशी एक अत्यंत फायदेशीर गोष्टी सांगण्यास आमही उत्सुक आहोत. चहा ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच आवडते.पण आपण सगळेच चहाच्या बाबतीत एक मोठी चूकही  करतो. जवळपास सगळ्यांचीच ही सवय असते की कपात चहा गाळल्यानंतर ते चहाचा गाळ फेकून देतात. पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की एकदा वापरली गेलेली चहाची पावडर दुसर्यांदा अनेक कामांसाठी वापरली जाऊ शकते. चला पाहूया की चहाची पावडर फेकण्याऐवजी दुसर्यांदा कशी काय वापरता येईल. असा होऊ शकतो चहा पावडरीचा पुनर्वापर.

सर्वात आधी चहा बनवल्यानंतर उरलेली चहापावडर फेकण्याऐवजी नीट साफ करून घ्या. साफ करताना अशा प्रकारे साफ करा की त्यातून साखरेचा गोडवा निघून जाईल. मग आपण ही चहापावडर वेगवेगळ्या कामांसाठी वापरू शकता. सर्वात प्रथम फायदा म्हणजे आपण उरलेली चहापावडर नीट साफ करून घेतल्यावर नैसर्गिक कंडीशनर प्रमाणे वापरू शकता. नैसर्गिक कंडीशनरच्या रूपाने चहा वापरण्याकरता चहापावडर पाण्यात उकळून घ्या आणि मग त्या पाण्याने केस धुवा.

उरलेल्या चहापावडरीचा दुसरा  उपयोग  तुम्ही घरातली भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. यासाठी चहापावडर भांडी घासण्याच्या पावडरीत मिसळून घ्या. यामुळे घरातील सगळी भांडी चमकतील आणि साफ दिसतील. जी चहापावडर आपण आतापर्यंत फेकून देत होतात तिचा वापर खत म्हणून होऊ शकतो.

रोपांसाठी हे उत्तम खताचे काम करते. वापरलेल्या चहाची पावडर तुम्ही खत म्हणूनही वापरु शकता. उरलेली चहा पावडर गाळल्यानंतर फेकून न देता ती झाडांना घाला. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते. चहापावडरीत ऐंटीऑक्सिडेंट असतात, ज्याचा जखम झाल्यास खूप उपयोग होतो.यासाठी चहापावडरीने जखम साफ करा, याने जखमा लवकर भरतात.

चहापावडरीचा उपयोग माश्यांपासून सुटका करण्यासाठीही होतो. जर घरात खूप माश्या झाल्या असतील तर उरलेली चहापावडर एका बालदीत घालून पूर्ण घरात पोतं करा. याने माशा दूर होतील. जर तुम्ही काबुली चणे बनवत असाल तर त्यातही चहापावडरीचा वापर होऊ शकतो. यासाठी चहापावडरीची पुरचुंडी बनवा आणि तिला एका भांड्यात चण्याबरोबर उकळून घ्या ज्याने जेवणाची लज्जत वाढेल.

उरलेल्या चहा पावडरीमध्ये थोडीशी विम पावडर मिसळून क्रोकरी साफ केल्यास त्यांना चमक येते. दातदुखीचा त्रास होत असल्यास चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल.

मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट करून सांगा आणि लाईक व शेयर नक्की करा. अश्याच माहितीपूर्ण पोस्टसाठी आमचे पेज नक्कीच लाईक करा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.