या लक्षणांमधून तुम्हाला समजेल, तुमचा जोडीदार स्वार्थी नाही ना?

प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर कधी ना कधी प्रेमाची गरज भासू लागते. जेव्हा एखादी व्यक्ति दुसर्‍या व्यक्तीच्या प्रेमात पडते, तेव्हा जगात त्याच्यासाठी त्याचा जोडीदार हाच सगळ्यात जास्त त्याला प्रिय असतो. काही वेळा तो त्याच्या चुकांकडेही दुर्लक्ष करतो.

परंतु, हळू हळू जोडीदाराच्या या चुका त्यांच्यातील नाते कमकुवत करतात. आज प्रेमाच्या नावाखाली कितीतरी लोकांची फसवणूक करणार्‍यांची कमी नाही. खासकरुन फसवल्या जाणार्‍यामध्ये मुलीची संख्या आघाडीवर आहे. म्हणूनच, जर आपण एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध जोडणार असाल, तर प्रथम हे लक्षात घेऊया की तो जोडीदार स्वार्थी तर नाही ना ? आज आम्ही तुम्हाला अशा काही खुणांबद्दल किंवा लक्षणांबद्दल सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्ही सहज ओळखू शकता की समोरची व्यक्ति स्वार्थी आहे की नाही? चला तर मग, बघूया विस्ताराने..खालील वर्तणूक दर्शविते की आपला जोडीदार स्वार्थी आहे:

बोलण्या-बोलण्यात संबंध तोडून टाकण्याची धमकी : कोणत्याही वेळी जेव्हा आपला जोडीदार आपल्‍याला कोणत्याही क्षुल्लक वादावादीमुळे संबंध तोडण्याची धमकी देतो, तेव्हा आपण समजून जावे की तो आपल्या बरोबरच्या नात्याला कंटाळला आहे आणि तो केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी आपल्याबरोबर राहतो आहे.

प्रत्येक वेळी आपलेच म्हणणे खरे करणे: जर आपला जोडीदार प्रत्येक निर्णय स्वत:च्याच मर्जीने घेत असेल व तुमचे काहीही ऐकतच नसेल, तर समजून घ्या की तुमचा गैरफायदा घेतला जातो आहे. जर आपण अशा जोडीदारासह राहात असाल, जो आपल्या वेळेचा, कष्टाचा किंवा आपल्या भावनांचा आदर व कदर करीत नसेल, तर स्वत:च्या बाबतीत तातडीने निर्णय घ्या.

संभाषण बंद झाले असेल तर: जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर योग्य वेळ घालविण्याच्या संधी शोधत असाल, परंतु तो मात्र तुम्हाला भेटत नसेल किंवा तुमच्याशी बोलणे टाळत असेल, तर आपला जोडीदार स्वार्थी आहे हे तुम्ही समजून जा. हे खरे आहे, की आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणालाही कोणासाठी वेळ देणे अवघड आहे, पण अशक्य नाही, मनात असेल तर वेळ काढता येऊ शकतो.

प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार: तज्ञांच्या मते, कोणत्याही नातेसंबंधात, जर एका जोडीदाराची विचारसरणी नेहमी नकारात्मक असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की हा नातेसंबंध अयशस्वी ठरेल. होय, तुमचा जोडीदार जर तुमच्यावर सतत टीका करत असेल किंवा तुम्हाला तुम्हाला जर नकारात्मक सल्ला देत असेल, तर तुमचा जोडीदार नक्की स्वार्थी आहे.

तुमच्यासमोर दुसर्‍यांशी प्रेमाने वागणे: जर आपला जोडीदार आपल्या एखाद्या मैत्रिणीबरोबर किंवा दुसर्‍या कोणाबरोबर छेडछाड करत असेल, मजा मस्ती करीत असेल, तर याचा अर्थ असा आहे की तो आपली फसवणूक करीत आहे. होय, हे खरे आहे, की स्वार्थी जोडीदार आपल्या नात्याची कदर न करता, इतरांशी मजा करण्यात, किंवा प्रेमाने वागण्यात आपला वेळ वाया घालवतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.