लाखो रुपयांच मानधन मिळत असूनही अंजली भाभीने या कारणामुळे सोडली तारक मेहता मालिका….

खूप काळापासून सुरू असलेल्या टीव्ही मालिका “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेतील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहता आणि रोशन सिंह सोंढी या भूमिकेत अभिनेता गुरुचरण सिंहने जी जागा प्रेक्षकांच्या मनात बनवली आहे, त्यांची भरपाई नव्या कलाकारांना करण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

टेलिविजन मालिका “तारक मेहता का उल्टा चश्माच्या” चित्रीकरणातसुद्धहा खूप उलटे सुलटे घडत आहे. आताच्या मालिकेत काम करणारी व अंजली भाभी ही भूमिका निभावणारी नेहा मेहता या अभिनेत्रीने या मालिकेमधून स्वत:ला वेगळे केले आहे. तिने ही मालिका सोडली आहे.

तिच्या जागी या मालिकेत आता अभिनेत्री सुनयना फौजदार हिला घेण्यात आले आहे. सुनायना हिने रविवार पासून चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सुनायनाला दर्शकांनी “तुजसे लागी लागन” “कुबुल है” “एक रिशता साजेदारिका” “संतान” “लेफ्ट राइट लेफ्ट” तसेच “बेलनवाली बहू” या सारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून काम करताना बघितले आहे.

मीडियाच्या माहितीनुसार १२ वर्षे चाललेल्या या मालिकेतील लोकप्रिय भूमिका निभावणार्‍या नेहा मेहताचे प्रोड्यूसर बरोबर चांगले संबंध नव्हते. कितीतरी वाद विवादांनंतर नेहा मेहताने ह्या मालिकेपासून वेगळे होणे इष्ट समजले. नेहा मेहता ही मालिकेत तारक मेहता (अभिनेता आशीष लोढा) यांच्या पत्नीच्या म्हणजेच अंजली मेहता या भूमिकेत काम करीत होती. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत आता अंजलीच्या भूमिकेत अभिनेत्री सुनयना फौजदार तुम्हाला बघायला मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा मेहताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो इतर प्रकल्पांमुळे सोडला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की नेहाला एक रंजक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि यामुळे तिने हा लोकप्रिय शो सोडण्याचा विचार केला आहे. शो सोडण्यापूर्वी नेहाने निर्मात्यांना माहिती दिली होती, असं सांगण्यात येत आहे. पण नेहा तिच्या करिअरविषयी काहीतरी वेगळंच प्लॅन करत आहे आणि त्यामुळे ती या शोमधून बाहेर पडली.

खूप काळापासून सुरू असलेल्या टीव्ही धारावाहिक “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अंजली भाभीची भूमिका निभावणार्‍या नेहा मेहता आणि रोशन सिंह सोंढी यांच्या भूमिकेत गुरुचरण सिंहने यांनी प्रेक्षकांच्या मनात जी आपली जागा निर्माण केली आहे, ती पसंती मिळवायला नवीन कलाकारांना खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. दोन्ही कलाकारांनी आपल्या कामाने प्रेक्षक वर्गाला प्रभावित केले आहे. प्रेक्षक त्या दोघांवर खूपच खुश आहेत. त्यांना भरपूर प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे.

तारक मेहता शोवर नेहा मेहताची एका भागासाठी घेते इतकी फी : वृत्तानुसार नेहा मेहता या मालिकेच्या एका भागासाठी सुमारे 35 ते 40 हजार रुपये घेत होती. ती महिन्यातून फक्त 15 दिवस शूट करत होती. रिपोर्ट्सनुसार नेहा कडे ऑडी आणि बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या देखील आहेत.  तारक मेहता शोमध्ये लग्न झालेली अंजली खऱ्या आयुष्यात अविवाहित आहे. एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की तिला लग्नाची घाई नाही. पण अंजली आपल्या भावी पतीबद्दल नक्कीच सांगते की तिला नात्याला गांभीर्याने घेणारा नवरा हवा आहे.

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *