आताच्या काळात बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे तब्येतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्भवणार्या कितीतरी स्वाथ्यविषयक समस्या आहेत. आताच्या धावपळीच्या जीवनात व आजच्या प्रदूषणाच्या काळात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. माणसाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे, अनेक आजाराना त्यांना तोंड द्यावे लागते आहे. अशा धावपळीच्या जीवनशैलीमुळे बाहेरचे फास्ट फूड खाणे, रस्त्यावरील गाड्यांवर उभे राहून खाणे हे सर्वसाधारण झाले आहे. मुले सुद्धहा आजकाल पिझ्झा, पास्ता, हे असे पदार्थ मोबाइल वरुन घरपोच मागवु लागली आहेत.
परिणाम, व्हायचा तोच होतो आहे. गॅस म्हणजेच पोटात अॅसिडिटी होणे ही समस्या सर्वसाधारण झाली आहे. हल्लीच्या काळात असे कितीतरी लोक आहेत, जे या गॅसच्या समस्येने पीडित आहेत. दर डोई प्रत्येकी तसे १० ते १५ लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. ही समस्या फक्त वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेऊन बरी होणारी नाही. त्यासाठी आपल्याला आपण काय खातो याकडे लक्ष देणे फार जरुरीचे आहे. कोणत्या वस्तु किती प्रमाणात, कधी खाल्या पाहिजेत हे लक्षात घेणे जरूरी आहे.
आताच्या काळात पौष्टिक आहार घेण्याऐवजी फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडचे सेवन जास्त केले जात आहे. त्यामुळे पोटात गॅसची समस्या वारंवार होते आहे. अशा स्थितीत पोट फुगणे, पोट दुखणे, तसेच आंबट ढेकर येणे हे सुरू होते. चला तर मग समजून घेऊया, कोणत्या वस्तु आपण आपल्या खाण्यातून वगळल्या पाहिजेत.
कांदा आणि बटाटा: कांदा बटाटा ही तर आपल्याला रोजच्या जेवणात लागणारी वस्तु आहे. पण ती कधी खाली पाहिजे ते मात्र आपण लक्षात घेत नाही. जे लोक कांदा आणि बटाटा खातात, त्यांनी रात्रीच्या जेवणात तो वर्ज्य केला पाहिजे. कारण यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असते, जे गॅस तयार करायला मदत करते.
फास्ट फूड: जर तुम्हाला गॅसच्या समस्येपसून स्वत:ला वाचवायचे असेल, तर फास्ट फूड खाणे बंद करा, जसे की, बाहेरचे समोसा, वडा पाव, मिसळ, पावभाजी. यामध्ये जास्त प्रमाणात मसाल्यांचा वापर केलेला असतो. ज्यामुळे पोटात उष्णता निर्माण होत जाते आणि त्यामुळे गॅस व जळजळणे यासारख्या समस्या उद्भवतात.
पत्ताकोबी : भाज्या खाणे आपल्या तब्येतीसाठी उत्तम आहे. पत्ताकोबी ही तशी लहान थोर सगळ्यांनाच आवडणारी भाजी आहे. परंतु, पत्ताकोबी खाल्यामुळे गॅस ची समस्या निर्माण होते. दुधाचे सेवन: दूध सेवन करताना नेहमी थंड दूधच प्यायले पाहिजे, किंवा त्यात साखर मिसळून ते दूध प्यायले पाहिजे. गरम दूध घेतल्याने गॅसची समस्या उत्पन्न होऊ शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.