आताच्या धावपळीच्या जीवनात व आजच्या प्रदूषणाच्या काळात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. माणसाला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे, अनेक आजाराना त्यांना तोंड द्यावे लागते आहे. आजारी असताना बहुतांशी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात. पण सगळ्यांनाच ही औषधे परवडतात असे नाही. त्यातील काही औषधे इतकी महाग असतात, की ती सर्वसामान्य माणसांना परवडत नाहीत. मग अशा वेळी घाबरून जायची जरूर नाही. आम्ही आज तुमच्यासाठी स्वयंपाकघरातील औषध घेऊन आलो आहोत. काय आहे ती गोष्ट जाणून घ्या:
परंतु आज आम्ही तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात नेहमी वापरात असलेल्या अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. होय, आम्ही दुसर्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलत नाही, तर कोथिंबीरीविषयी सांगत आहोत. कोथिंबीर चविच्या बरोबरच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कोथिंबीरीचे गुणधर्म: कोथिंबीरीचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित होते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. कोथिंबीरीत लोह, व्हिटॅमिन-ए, के, सी, फॉलिक अॅसिड , मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम, थायमिन आणि कॅरोटीन असते. कोथिंबीर आपण रोजच्या जेवणात वापरतो, ती जेवण स्वादिष्ट बनवते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कोथिंबीर ही दाह थंड करणारी आहे आणि शरीरातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म यात आहेत. त्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रण आणि पाचनशक्ती सुधारते. तसेच कोथिंबीर ही मधुमेहासाठी एक चांगला पर्याय आहे. मधुमेही लोकांनी कोथिंबीरीचा उपयोग रोजच्या जेवणात केलाच पाहिजे.
कोथिंबीरीचे पाणी मधुमेह नियंत्रित करण्याचा एक चांगला उपाय आहे. एका अभ्यासानुसार कोथिंबीरीच्या बियामध्ये म्हणजेच धण्यांमध्ये अशी संयुगे आढळतात, जी रक्तामध्ये आढळल्यास अँटी-हायपरग्लैकेमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग आणि इन्सुलिन तयार करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. कोथिंबिरीचे पाणी दररोज जर मधुमेहाच्या रुग्णांनी घेतले तर त्यांच्यासाठी ते खूपच फायदेशीर आहे.
कोथिंबीर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तुमचे केस गळत असतील, तर कोथिंबीरीची पेस्ट करून ते केसांना लावून ठेवा. थोड्या वेळाने केस स्वछ धूवून टाकणे. यामुळे केस गळती थांबेल आणि केसांची चांगली वाढ होईल. तसेच गॅस, अपचन, पोटदुखी यावर कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबीर पाण्यात उकळून ते पाणी थंड करून दररोज घ्या. वरील सर्व समस्यांपासून सुटका होईल.
सगळ्यात प्रथम १० ग्राम धणे घेऊन २ लिटर पाण्यात रात्रभर भिजवणे. सकाळी त्यांचे पाणी काढून घ्या आणि ते अंशपोटी प्या. त्या शिवाय पूर्ण दिवस सुद्धहा तुम्ही हे पाणी पित राहिले तरी फायदेशीर आहे. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.